Parola

“अर्भकाचा” बाप कोण?

“अर्भकाचा” बाप कोण?

प्रतिनीधी- प्रविण काटे

विविध विचारांची व विविध विचार सरणीची माणसं ह्या समाजात वावरत असतात पण माणसाची विचार सरणी एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन पोहचेल ह्याची कल्पना सुधा माणूस करू शकत नाही. अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना पारोळा तालुक्यात घडून आली.येथील हवालदार मोहल्ला परिसरात आज पहाटे 10 वाजेच्या सुमारास शहरातील हवालदार मोहल्ला परिसरात राहणारे इबा (पुर्ण नाव माहीत नाही) महीला हे सकाळी छतावर कपडे टाकण्या साठी छतावर गेले असता त्याना एक मृत अर्भक विचित्र अवस्थेत दिसून आले त्या अर्भकाचा भाग हा कंबरे पासून पूर्ण विचित्र अवस्थेत होता. ह्या विचित्र अर्भकाला बघून बघणाऱ्यांच्या अंगावर काटाच उभा राहिला व ह्या घटनेमुळे पारोळा शहरात एकच खळबळ उडाली.

ह्या अर्भकाला बघून विविध तर्क वितर्क लावले जात आहेत हे अर्भक अनैतिक संबंधातून,तर नाही ना, याचा बाप कोण असेल ?त्याला त्याच्या पालकांनी का बर छतावर फेकले असेल? ह्या मृत अर्भकाला न्याय मिळेल का? त्याच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या चा पोलीस शोध घेतील का? अशा उलट सुलट चर्चा नागरिकानी व्यक्त केल्या आहेत.पोलीस प्रत्यक्ष घटना स्थळी दाखल होउन पुढील तपास करत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button