Bollywood

FactCheck: पद्मश्री पुरस्कार प्राप्त अभिनेते आणि क्रिकेटर्स म्हणतात गुटखा खा.. जुगार खेळा…! पहा साऊथच्या अभिनेत्यांची कमाल..!

FactCheck: पद्मश्री पुरस्कार प्राप्त अभिनेते आणि क्रिकेटर्स म्हणतात गुटखा खा.. जुगार खेळा…! पहा साऊथच्या अभिनेत्यांची कमाल..!

“देखते है कौन नया खिलाडी आया है. उसे अच्छेसे समझायेंगे, वो भी अपनी जुबाँ में.” माफियाचं गेटअप असणारे दोन व्यक्ती गाडीमध्ये बसून एका ठिकाणी जाताना हे बोलत असतात. थोड्या वेळात जेव्हा ते त्या ठिकाणी पोहोचतात तेव्हा तिसरा व्यक्ती एंट्री घेतो. एंट्री घेताना तो अगदी तलवारीने एक पुडी फोडतो आणि खातो. हे बघून इतर दोघे म्हणतात “ये तो अपनी जुबाँ का है.”

मग तिसरा व्यक्ती म्हणतो “जुबाँ एक हो तो दिल भी एक होने चाहिए” इतकं म्हणून तिन्ही व्यक्ती कॅमेऱ्याकडे बघतात आणि म्हणतात…

बोलो जुबाँ केसरी

इथवर येईपर्यंत तुम्हाला कळलं असेलच की, आम्ही कशाबद्दल बोलतोय. हो, विमल हाच ब्रँड आहे आणि ही एकदम नवी ॲडव्हर्टाइज आहे. ॲडमधले ऍक्टर्स आहेत अजय देवगण, शाहरुख खान आणि अक्षय कुमार. मात्र जेव्हापासून ही ॲड आली आहे, तेव्हापासून त्यांना खूप ट्रॉल केलं जात आहे. कारण साहजिकच आहे की, त्यांनी ‘तंबाखू’ची जाहिरात केलीये.

सध्या तरूण वर्गाला देशभरात आयपीएलच्या निमित्ताने जुगाराचं वेड लागलं आहे. रोज संध्याकाळी केवळ तरूणच नव्हे तर ज्येष्ठ नागरिकही एकत्रितपणे सामने बघायला बसतात आणि ड्रिम इलेव्हन सारख्या काही अॅपचा वापर करत जुगार खेळतात, अशी सध्याची स्थिती आहे.तरुणांनो सांभाळून आपले आयडल निवडा..!

वास्तविक जुगार असू दे अथवा कर्करोगाला निमंत्रण देणारा गुटखा असू दे. तरुणाईसाठी तो कधीही घातक आहे. मात्र तरीही बॉलिवूडचे अभिनेते छोट्या पडद्यावर येतात आणि तमाम भारतीयांना गुटखा खा असं सांगतात. त्यातच आता क्रिकेटपटूही आम्ही तुमचं काम सांभाळतो, तुम्ही जुगार खेळा, असं सांगताना दिसतात.

क्रिकेटपटू आणि अभिनेते यांनी केलेल्या या जाहिराती म्हणजे तरूणाईचं भवितव्य संपविण्याचा उद्योग आहे. आज पोलीस एकीकडे गुटख्याच्या दुकानावर धाड मारत असताना अभिनेते थेट जाहिरातीतून गुटखा खाण्याचं आवाहन करतात.

त्यातच आता क्रिकेटपटुही मागे राहिलेले नाहीत. आयपीएलच्या माध्यमातून जुगार खेळा आणि खूप पैसे मिळवा, अशा जाहिरातीच हे क्रिकेटपटू करताना दिसत आहेत.

वास्तविक अशा जुगारावर बंदी येणं गरजेचं आहे. या अॅपच्या कंपन्या या खेळात आर्थिक नुकसान होऊ शकतं आणि सवय लागू शकते, असा इशारा देतात. मात्र तरीदेखील तरूणवर्ग मोठ्या प्रमाणावर आयपीएल क्रिकेटमध्ये या अॅपच्या माध्यमातून जुगार खेळताना दिसत आहेत.

केवळ आयपीएलमध्येच नव्हे तर वर्षातून ३६५ दिवसांपैकी किमान २०० दिवस याच अॅपवरून खुलेआमपणे जुगार खेळला जातो. त्यातच अगदी ३५ रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यंत दैनंदिन जुगार या अॅपवरून खेळला जाऊ शकतो. त्यामुळे शहरी भागातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील तरूणांना आणि सर्वसामान्य लोकांना या जुगाराचं वेड लागलं आहे. गुटखा आणि जुगार या दोन्ही गोष्टी तरूण आणि इतर लोकांसाठी हानीकारक आहेत. मात्र तरीही त्याची धुमधडाक्यात जाहिरात केली जाते हे सर्वात मोठं दुर्दैवं..

चला तर मग साऊथ कडे वळू या…
दुसरीकडे मात्र साऊथच्या इंडस्ट्रीचा खूप कौतुक केलं जात आहे. याला कारण आहे, साऊथच्या अक्टर्सनं अशा चुकीचा संदेश देणाऱ्या जाहिराती नाकारणं. नुकतंच साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनने हे सिद्ध करून दाखवलं आहे. फक्त अल्लू अर्जुनच नाही तर इतर देखील या रांगेत आहे.

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनने त्याला आलेली ६ करोडची ड नाकारली आहे. साफ ‘नाही’ असं अल्लू अर्जुन म्हणालाय. आता अल्लू अर्जुनकडे कित्येक ड असतील. कदाचित यापेक्षा जास्त पैसे त्याला हवे असतील, म्हणून नाही म्हणाला असेल, असं वाटत असेल तर थांबा. याचं कारण फक्त एक होतं.

तर ही ड होती ‘तंबाखू’ची..

“मी माझ्या चाहत्यांपर्यंत चुकीचा संदेश कधीच पोहोचवणार नाही” असं एक साधं वाक्य म्हणत अल्लू अर्जुनने ही सोडली. वाक्य साधं असलं तरी अल्लू अर्जुनाच्या लेखी त्याचं महत्व खूप जास्त आहे. कारण कुणाचाही रोल मॉडेल असणं मोठी जबाबदारी असते, त्यातही लोक तुमच्या कृतींना फोलो करत असतील तर अजूनच विश्वासानं आणि भानावर राहत वागावं लागतं.

या एका छोट्या कृतीमुळे त्याची देशभरात वाहवाही होतीये. एक आदर्श व्यक्तिमत्व कसं असावं, हे अल्लू अर्जुननं दाखवून दिलंय, असं म्हणत फॅन्सचं तोंड दुखत नाहीये.

तर याआधी अशीच कृती साउथ क्वीन ‘साई पल्लवी’ हिने देखील केली आहे.

२०१५ मध्ये आलेल्या ‘प्रेमम’ या चित्रपटातील भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या साई पल्लवीने २०१९ मध्ये एका फेअरनेस क्रीमची व्हर्टाइज नाकारली होती. २ कोटी रुपये तेव्हा तिला ऑफर करण्यात आले होते. मात्र तरी तिने नकार दिला होता. एका मुलाखतीत तिने आपला निर्णय स्पष्ट करताना म्हटलं होतं की…“हा भारतीय रंग आहे. आपण परदेशी लोकांकडे जाऊन त्यांना विचारू शकत नाही की ते गोरे का आहेत. आपण त्यांच्याकडे बघून आपल्यालाही ते हवे आहे, असा विचार करू शकत नाही. तो त्यांच्या त्वचेचा रंग आहे आणि हा आपला आहे. आफ्रिकन लोकांचाही स्वतःचा रंग आहे आणि ते सुंदर आहेत.”

तिसरे आहेत लोकप्रिय ज्येष्ठ तेलगू अभिनेते ‘नंदामुरी बालाकृष्णा’

भवानी द टायगर, सिम्हा असे अनेक चित्रपट फेम बालाकृष्णा यांनी तर आजपर्यंत कोणत्याच ब्रँडची केलेली नाहीये. ते अशा कलाकारांपैकी एक आहेत जे कधीही कोणत्याही टीव्ही किंवा प्रिंट जाहिरातीत दिसले नाहीत. तर सोशल मीडियावरही कोणत्याही ब्रँडची जाहिरात केली नाही.

एका मुलाखतीत त्यांनी याबद्द्ल सांगितलं होतं की, ते अशा लोकांपैकी एक नाही जे आपल्या चाहत्यांचा आणि तेलगू लोकांचा व्यावसायिक कारणांसाठी वापर करतात आणि त्यातून पैसे कमवतात. एक अभिनेता म्हणून, माझ्या चित्रपटांच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन करणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी आयुष्यभर ते करत राहीन.

माझं काम कोणत्याही ब्रँडची जाहिरात करत माझ्या फॅन्सला भुलावणं हे नाहीये, असं त्यांचं म्हणणं राहिलंय.

एकीकडे आहेत अल्लू अर्जुन, साई पल्लवी आणि नंदामुरी बालाकृष्णा यांच्यासारखे साऊथ कलाकार ज्यांनी नैतिकता जाणत चुकीच्या गोष्टीला समर्थन कधीच केलं नाहीये. जेव्हा एखादं असं व्यक्तिमत्व ज्याला सामान्य लोक फॉलो करत असतात तेव्हा कोणत्याही गोष्टीचं ब्रँडिंग करताना विचार करावा लागतो. आदर्श असणं आणि ते जपणं, हे त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवलंय.

तर दुसरीकडे आहेत तीन पद्मश्री बॉलिवूड अभिनेते, जे सर्रास तांबखूची ॲ करतायेत.

साऊथ अभिनेते ज्यांनी अशा चुकीच्या ॲला डायरेक्ट नकार दिलाय. यातच दडलंय त्या प्रश्नाचं उत्तर जो आजकाल खूप विचारला जातोय की, लोक का साऊथ चित्रपट आणि अभिनेत्यांकडे आकर्षित होतायेत.

तुम्हाला या प्रकारणाबद्दल काय वाटतं? कुणाची भूमिका योग्य वाटते? आम्हाला कंमेंट्समध्ये नक्की सांगा..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button