Parola

प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा

प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा

पारोळा प्रतिनिधी – कमलेश चौधरी

लोकमान्य टिळक शिक्षण संस्था संचालित, पारोळा शहरातील एकमेव सी.बी.एस.ई. बोहरा सेंट्रल स्कूल येथे 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा
प्रसंगी संस्थेचे चेअरमन सुरेंद्र बोहरा, योगगुरु मुकुंद बोहरा, श्वेता बोहरा, शाळेचे प्राचार्य शोभा सोनी ऍडमिनिस्ट्रेटर वीरेंद्र सखा व पाहुणे म्हणून शाळेचे पी. टी. ए. मेंबर बिऱ्हाडे मॅडम, सोनवणे सर, संदीप कासार, राकेश जैन, अनिल चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
आजच्या दिवसाचे विशेष आकर्षण म्हणजे ध्वजारोहन समारोह हा माजी गुणवंत विद्यार्थी, लोकेश किरण चौधरी व पुष्कर श्रावण देवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यामागचे कारण असे की या गुणवंत विद्यार्थ्यांनी जेईई व नीट सारख्या परीक्षांमध्ये यश संपादन केले लोकेश किरण चौधरी याने जेईई परीक्षेत यश संपादन केले असून त्याला ऑल इंडिया रँक 6377 एकूण1.5 लाख विद्यार्थ्यां पैकी, व 134 गुण प्राप्त करून आपला प्रवेश निश्चित केला. तसेच पुष्कर श्रावण देवरे याने नीट परीक्षेमध्ये ऑल इंडिया रँक 13608 एकूण 16 लाख विद्यार्थ्यां पैकी, व 720 पैकी 613 गुण मिळवून शाळेचे व पारोळा शहराचे नावलौकिक केले, म्हणून या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. सदर विद्यार्थी हे बोहरा शाळेत वर्ग 1ली पासून शिकत होते. कोणतीही प्रकारची ट्युशन नसताना देखील त्यांनी हे यश संपादन केले. म्हणून त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून गौरविण्यात आले. व बक्षीस व ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.याबाबत आपले मनोगत व्यक्त करताना या विद्यार्थ्यांनी, आपल्या अभ्यासाची पद्धत व शाळेतून मिळालेले शिक्षकांचे मार्गदर्शन व शाळेमुळे इंग्रजी भाषेवरचे मिळालेले प्रभुत्व यामुळे ते या परीक्षेत यश संपादन करू शकले असे उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व शाळेचे व शिक्षकांचे आभार मानले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन च्या माध्यमाने विविध स्पर्धांचे आयोजन केले होते यात देशभक्ती गीत स्पर्धा, नृत्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा,निबंध लेखन स्पर्धा, ड्रॉइंग स्पर्धा घेण्यात आल्या वयात ऑनलाइन च्या माध्यमाने सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या सादरीकरणाचे व्हिडिओ शाळेच्या व्हाट्सअप ग्रुप वर पाठवले. शाळेच्या प्राचार्या शोभा सोनी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थेचे चेअरमन सुरेंद्र बोहरा व उपस्थित मान्यवरांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.प्रसंगी अभिवादनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button