Parola

कोळपिंप्री येथे घरफोडी..लाखोंचा ऐवज लंपास..!

कोळपिंप्री येथे घरफोडी..लाखोंचा ऐवज लंपास..!

पारोळा तालुक्यातील कोळपिंप्री येथे घरफोडी झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी आनंदराव रामचंद्र निकम वय 38 धंदा वेल्डिंग काम रा कोळपिंपरी तालुका पारोळा यांनी दि 04.02.2022 रोजी दुपारी तीन वाजता आपलं लहान मुलाचे जावळ कार्यक्रम साठी बांभोरी तालुका धरणगाव येथे गेले असल्याने त्यांच्या घराला कुलूप लावून गेले होते. दि.07.02.2022 रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांच्या शेजारी राहणाऱ्या राजु किसन निकम यांनी देवा सकाळी दार उघडलं तेव्हा फिर्यादी आनंदराव रामचंद्र निकम यांच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या कडी कोंडा तोडलेला असून घराचे दरवाजे उघडे होते. त्यावेळी मनीष निकम,प्रवीण निकम शेजारी यांनी घरात जाऊन पाहिले असता गोदरेज कपाटाचे दरवाजे उघडे होते व कपाटातील ठेवलेला सामान बाहेर अस्ताव्यस्त पडलेला होता. त्यावेळी कपाटात ठेवलेले चांदीचे सात भार चे ब्रेसलेट व रोक रक्कम एक लाख साठ हजार रुपये हे चोरट्यांनी चोरून नेल्याचे निदर्शनास आले. फिर्यादी आनंद रामचंद्र निकम यांच्या वेल्डिंग हे काम करून जी काय आपली घरातील सगळी रोख रक्कम होती ती चोरट्यांनी चोरून नेले आहे.त्यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवी 387,454,457 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोउपनी योगेश जाधव करत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button