Thane

?Breaking..अंगणवाड्यात शुद्ध पाण्याचा अभाव ;शंभर दिवसात पाणी देण्याचे उद्दिष्ट

?Breaking..अंगणवाड्यात शुद्ध पाण्याचा अभाव ;शंभर दिवसात पाणी देण्याचे उद्दिष्ट

ठाणे : पुरोगामी आणि नगरविकाससह औद्योगिक विकासाच्या गप्पा मारणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील ४४९ ग्रामीण व एकात्मिक आदिवासी बालविकास प्रकल्पांतर्गत ९३ हजार ६७५ अंगणवाड्या असून, यापैकी तब्बल ५२ हजार २६९ अंगणवाड्यांमध्ये २४ तास शुद्ध पाणीपुरवठा होत नसल्याचे वास्तव आहे.

हि भीषण बाब समोर आल्यानंतर उशिरा का होईना, आता जल जीवन मिशन अंतर्गत या अंगणवाड्यांना येत्या १०० दिवसांत शुद्ध पाणी देण्याचे लक्ष्य पाणीपुरवठा विभागाने ठेवले आहे. यासाठी ग्रामपंचायती, अंगणवाडी सेविका, महिला बालविकास विभाग, संबंधित जिल्हा परिषद, सर्व शिक्षा अभियानांची मदत घेतली जाणार आहे. त्यांनी सर्व्हे करून ज्या अंगणवाड्यांत पाणी नाही, त्यांच्या माहितीसह सध्या उपलब्ध असलेले पाण्याचे स्रोत आणि उपायांची माहिती दिल्यानंतर संबंधित अंगणवाडीत २४ तास शुद्ध पाणीपुरठा करण्याचे उद्दिष्ट आहे.
अंगणवाडीत ० ते सहा वयोगटांतील बालके, गर्भवती महिला आणि किशोरवयीन मुलींची काळजी घेतली जाते. मात्र, महाराष्ट्रातील तब्बल ५२ हजार २६९ अंगणवाड्यांमध्ये पाणीच नसल्याने, यांच्या तेथे येणाऱ्या उपरोक्त घटकांच्या आराेग्याचा प्रश्न निर्माण होतो. शु्द्ध पाण्याअभावी त्यांना तासनतास तहानलेेले राहावे लागते किंवा अशुद्ध पाणी प्यावे लागते, तसेच अनेक ठिकाणी पाणीच नसल्याने नैसर्गिक विधी करण्यासही अडचणी निर्माण होऊन ते अनारोग्याच्या खाईत सापडत आहेत.

शुद्ध पाण्यासाठी शोधले चार उपाय

अंगणवाडीत शुद्ध पाण्याच्या पुरवठ्यासाठी चार उपाय शोधले आहेत. यात ज्या अंगणवाडीच्या परिसरात शुद्ध पाण्याची बोअरवेल आहे, तेथे सबमर्सिबल पंप बसवून पाणी द्यावे, बोअरवेलला हंगामी पाणी असल्यास भूजल तज्ज्ञांचे मत घेऊन त्यात सुधारणा करून पाणी पुरविणे, गावात पाणीपुरवठा योजना आहे, परंतु भौगोलिक अंतरामुळे अंगणवाडीला शुुद्ध पाणी देणे शक्य नाही, तेथे नळपाणीपुरवठा योजनेतून पाइपलाइन टाकून नळजोडणी देणे आणि पाणीपुरवठा योजना आहे, परंतुु त्यात काही बिघाड असल्यास तो दुुरुस्त करून अंगणवाडीस पाणी देेणे असे हे चार उपाय आहेत.

आरोग्याचा प्रश्न

महाराष्ट्रातील तब्बल ५२ हजार २६९ अंगणवाड्यांमध्ये पाणीच नसल्याने, यांच्या तेथे येणाऱ्या घटकांच्या आराेग्याचा प्रश्न निर्माण होतो. शु्द्ध पाण्याअभावी त्यांना तासनतास तहानलेेले राहावे लागते .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button