Amalner

Amalner: मुद्रांक विक्रेते आणि दस्तलेखक संघटनेचे विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन..

Amalner: मुद्रांक विक्रेते आणि दस्तलेखक संघटनेचे विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन..

अमळनेर शहरातील उपविभागीय कार्यालयाच्या आवारातील मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक संघटना यांनी आपल्या नऊ ते दहा मागण्यांसाठी अमळनेरात एका दिवसाचं धरणे आंदोलन करून मागण्या मान्य करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हंटले आहे कि, शासनाने 100 व 500 रुपयांचे मुद्रांक विक्री बंद करू नये,मुद्रांक विक्रीचे कमिशन 3% ऐवजी 10% करावे, मुद्रांक विक्रीची मर्यादा दहा हजार रुपये वरून एक लाख रुपये पर्यंत मिळावी, फ्रांकिंग देखील मुद्रांक विक्रेऱ्यांकडून करण्यात यावे,स्टॅम्प विक्री करताना मदतनिस ठेवण्यास परवानगी मिळावी, वारसांना परवाने हस्तांतरित करून मिळावे,एक हजार रुपये वरील छापलेल्या मुद्रांक विक्रीस परवानगी मिळावी, शासनाने मुद्रांकाची छपाई बंद केली आहे ती त्वरित सुरू करावी, नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये आम्हाला बसण्यासाठी जागा मिळावी, या सह इतर मागण्यांसाठी तालुका मुद्रांक विक्रेते व दस्त लेखक संघटनेच्या वतीने बंद पुकारला होता. उपविभागीय अधिकारी यांना यावेळी निवेदन देण्यात आले.

यावेळी मुद्रांक संघटनेचे तालुकाध्यक्ष दत्ता संदानशीव, उपाध्यक्ष शामकांत शिंदे, गणेश येवले, सेक्रेटरी संजय साळुंखे, खजिनदार सतीश वाणी, सह खजिनदार धनंजय बडगुजर, प्रमोद वाणी, महेंद्र भावसार, देवीदास पाटील, मधुकर नारळे, सुनील पाटील, गुणवंत राव पाटील, विरेंद्रराव देशमुख, बापू पाटील, दिनेश पानकर, प्रशांत पवार इ एक दिवसीय धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button