Nandurbar

51 मद्यपी वाहन चालकांचे वाह्न चालक परवाना (लायसेन्स) निलंबित, नंदुरबार जिल्हा पोलीस दलाची कारवाई

51 मद्यपी वाहन चालकांचे वाह्न चालक परवाना (लायसेन्स) निलंबित, नंदुरबार जिल्हा पोलीस दलाची कारवाई

नंदुरबार फहिम शेख

मा. पोलीस उप महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांनी संपूर्ण नाशिक परिक्षेत्रात दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात विशेष मोहिम राबवून कारवाई करणेबाबत तसेच रस्ते अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्यमध्ये झालेली वाढ लक्षात घेता मा. पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत दारु पिऊन वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांविरुध्द् वेळोवेळी विशेष मोहिमांचे आयोजन करण्यात आले होते. सदर मोहीम सात्यत्याने सुरु असुन त्यात अधिक तिव्रता आणण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत चारचाकी व दुचाकी मोटार सायकल चालकांची तपासणी केली असता काही वाहन चालकांनी मद्यपान केलेले आढळुन आले, त्यामुळे त्यांचे विरुध्द् वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये एकुण 170 गुन्हे मद्यपी चालकांवर नोंदविण्यात आले गुन्हे दाखल करण्यात आलेले असुन अशा वाहन चालकाचा वाहन चालक परवाना निलंबित करण्याची प्रक्रिया नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत सुरु करण्यात आली होती. त्यात आता नंदुरबार शहर वाहतुक शाखा- 28, नंदुरबार शहर 08, उपनगर-04, विसरवाडी 01, नवापुर – 02, सारंगखेडा-02, धडगाव- 05, अक्कलकुवा-02, तळोदा 01 असे 45 वाहन चालकांचे लायसन्स 06 महिनेसाठी निलंबीत करण्यात आले आहेत.

आतापावेतो नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आलेल्या कारवाईमध्ये उप प्रादेशीक परिवहन अधिकारी नंदुरबार यांचेकडून एकुण 107 वाहन चालकांचे लायसन्स निलंबीत करण्यात आले आहेत. भविष्यात ही मोहीम आणखी तीव्रतेने राबविली जाणार आहे.

नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येते की, दारु पिऊन कोणीही वाहन चालवू नये, दारु पिऊन वाहन चालविणे केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर इतरांचे जिवितास देखील धोकेदायक आहे. नागरीकांनी स्वतःचे व इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियम पालन करावे. तसेच कोणीही मद्यपान करुन वाहन चालवू नये.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button