Jalgaon

Jalgaon Live: या ठिकाणी साकारतोय “पुस्तकांचा बगीचा”… राज्यातील पहिला उपक्रम

Jalgaon Live: या ठिकाणी साकारतोय पुस्तकांचा बगीचा…
देशभरात सर्वत्र वनस्पतींचे बगीचे, फुलांचे बगीचे मोठ्या संख्येने आहेत. मात्र एरंडोल नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी यांच्या संकल्पनेतून पालिकेच्यावतीने शहराबाहेर असलेल्या नवीन वसाहतींमधील आनंदनगर येथील ३३ गुंठे मोकळ्या जागेवर ‘पुस्तकांचा बगीचा’ उभारण्यात येत आहे.

वृद्ध नागरिक, महिला शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचन संस्कृतीत वाढ व्हावी, या उद्देशाने पालिकेतर्फे ‘पुस्तकांचा बगीचा’ उभारण्यात येत आहे. ’पुस्तकांचा बगीचा’ हा आदर्श उपक्रम राबविणारी एरंडोल नगरपालिका राज्यात पहिलीच पालिका ठरणार आहे.

एरंडोल पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी यांनी शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवून पालिकेची वेगळी ओळख निर्माण केली आहे. राज्यासह देशात वनस्पती, फुले, विविध प्रकारचे झाडे असलेले विविध सार्वजनिक उद्याने आहेत. सार्वजनिक उद्यानांमध्ये व्यायामाची साधने देखील आहेत. परंतु पुस्तकांचा बगीचा उपक्रम कोठेही नाही.

प्रशासक विकास नवाळे यांनी शहरात पालिकेच्यावतीने वेगळा उपक्रम राबविण्याची संकल्पना राबविण्याचे नियोजन केले. शहराबाहेर असलेल्या आनंदनगर येथील ३३ गुंठे मोकळ्या जागेत पुस्तकांचा बगीचा निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू करून ते यशस्वी करण्याचा संकल्प केला. आनंदनगरमधील पालिकेच्या मोकळ्या जागेचे सुशोभीकरण करून त्या ठिकाणी ‘पुस्तकांचा बगीचा’सुरू करण्याचा राज्यातील पहिलाच आदर्श उपक्रम राबवून प्रत्यक्ष कामास सुरुवात केली.

सद्यस्थितीत बगीच्याचे काम देखील अंतिम टप्प्यात आहे. वयोवृद्ध नागरी, महिला, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यात वाचनाची आवड निर्माण व्हावी, तसेच वाचन संस्कृतीत वाढ व्हावी, यासाठी पुस्तकांचा बगीच्याची निर्मिती करण्यात येत आहे. पुस्तकांच्या बगीच्यात वाचकांसाठी विविध प्रकारचे पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. उद्यानात ठिकठिकाणी पुस्तकांसाठी बॉक्स असून, वाचनासाठी आठ वाचन कट्टे बांधण्यात आले आहेत. उद्यानात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली असून, सर्वत्र नैसर्गिक वातावरण निर्माण करण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button