Parola

श्री संताजी महाराज जयंतीनिमित्त पारोळ्यात विद्यार्थींचा गुणगौरव समारंभ व मान्यवरांचा सत्कार

श्री संताजी महाराज जयंतीनिमित्त पारोळ्यात विद्यार्थींचा गुणगौरव समारंभ व मान्यवरांचा सत्कार

प्रतिनिधी पारोळा – कमलेश चौधरी

तेली समाजाचे आराध्य दैवत ग्रंथकार श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रदेश तेली महासंघ व युवक महासंघ वतीने तालुक्यातील तेली समाजाचे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा विविध मान्यवरांचा सत्काराचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला .
राष्ट्रीय महामार्ग 6 वरील नव्या तेली भवनात 8 डिसेंबर दुपारी चार वाजेला कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माजी आमदार शिरीष चौधरी, बीडचे नगराध्यक्ष डॉ भारतभूषण शीरसागर, प्रदेश तेली महासंघाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष के डी चौधरी, जिल्हा अध्यक्ष महिला निर्मला चौधरी सह विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.विद्यार्थांना प्रमाणपत्र , चिन्ह, व संताजी महाराज जीवन चरित्र पुस्तक देऊन गौरविण्यात आले. तसेच आलेल्या पाहुण्यांचे शाल व बुके देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे अध्यक्षपद रेखाताई चौधरी यांनी भूषविले. शिरीष चौधरी यांनी उत्तीर्ण विद्यार्थींचे कौतुक केले व पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. समाजासाठी आपण सर्व समाज बांधवांनी एकत्र यावे असेही ते या कार्यक्रमात म्हटले. कार्यक्रमासाठी नाव नोंदणी केलेल्या विद्यार्थी – पालक व समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते. विद्यार्थी गुणगौरव व सत्कार समारंभ हा प्रदेश तेली महासंघाचे तालुका अध्यक्ष भागवत चौधरी, शहराध्यक्ष प्रवीण राजाराम चौधरी,तेली समाज नवयुवक मंडळ, पारोळा व तेलीसमाज पंच मंडळ व कार्यकरणींनी आयोजित केला होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button