Parola

भडगाव महाविद्यालया तर्फे स.ध.भावसार सरांचा सत्कार

भडगाव महाविद्यालया तर्फे स.ध.भावसार सरांचा सत्कार

पारोळा प्रतिनिधी – कमलेश चौधरी

भडगाव महाविद्यालया तर्फे
स.ध.भावसार सरांचा सत्कार नुकताच करण्यात आला.
भडगाव येथील सौ.र.ना.देशमुख महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त येथील राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसार यांना मराठी भाषेसाठीच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा.डा अतुल देशमुख,प्रा डॉ दिपक मराठे,प्रा. अविनाश भंगाळे व प्रा दिनेश तांदळे यांनी पारोळा येथे सरांच्या निवासस्थानी येऊन शाल, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन भावपूर्ण सत्कार केला.आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देखील दिल्या.
भडगाव महाविद्यालयाने भावसार सरांच्या कार्याची दखल घेऊन सत्कार केल्या बद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सरांचे अभिनंदन करुन महाविद्यालयाचे चेअरमन संजय ओंकार वाघ, प्राचार्य डॉ. एन्. एन्. गायकवाड व मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. अतुल देशमुख यांना धन्यवाद दिले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button