Parola

रा.का.मिश्र.विद्यामंदिर,बहादरपूर मध्ये  ‘जल बेल ‘ विशेष कार्यक्रम संपन्न.

रा.का.मिश्र.विद्यामंदिर,बहादरपूर मध्ये ‘जल बेल ‘ विशेष कार्यक्रम संपन्न.

पारोळा (प्रतिनिधी) कमलेश चौधरी
पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथे सदर कार्यक्रमाला
माध्यमिक महाविद्यालयातील व जुनिअर कॉलेज विद्यार्थ्यांना पाणी पिण्याचे फायदे, पाणी कसे प्यावे ,किती प्यावे ,केव्हा प्यावे, याचे महत्व उदाहरणे देऊन वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रमाणबद्ध व अनेक हास्य विनोदातून स्वच्छतेचे महत्व,आरोग्य टिप्स विद्यालयातील विज्ञान शिक्षक श्री एस.बी.चौधरी.यांनी केले .त्यात रोज शाळेत येतांना स्वच्छ बाटलीत पिण्याचे स्वच्छ पाणी विद्यार्थ्यांनी आणावे व सकाळी शाळा भरल्यानंतर रोज आठ वाजून वीस मिनिटांनी एक पाणी पिण्यासाठी बेल होईल त्यावेळेस सर्व विद्यार्थ्यांनी आपली पाण्याची बाटली काढून हळुवार पद्धतीने थोड्या प्रमाणात पाणी प्यावे हे होत असतांना अभ्यासाकडे, तासीके कडे दुर्लक्ष होणार नाही याचे विद्यार्थ्यांनी भान ठेवावे हे सुद्धा स्पष्ट झाले.नंतर प्रत्यक्ष प्रात्यक्षिक म्हणून सर्व विद्यार्थ्यांकडून पाण्याची बाटली काढून सर्व विद्यार्थ्यांनी पाणी कसे प्यावे हे प्रात्यक्षिक केले गेले .सदर कार्यक्रमाला विद्यालयाचे सत्र प्रमुख श्री.ठाकरे सर, श्री.बाविस्कर सर ,श्री.शिवदे सर व सर्व शिक्षक बंधू-भगिनी हजर होते.कार्यक्रमाचे आभार विद्यालयाचे प्राध्यापक श्री.बी.व्ही. सोनार यांनी केले. अशा पद्धतीने विद्यालयात रोज जल बेल होईल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button