World

हे आहेत जगातील 8 सुंदर पुरुष..!पहा भारतातील व्यक्ती कोण आहे..?

हे आहेत जगातील 8 सुंदर पुरुष..!पहा भारतातील व्यक्ती कोण आहे..?

सौंदर्य आणि स्त्री हे एकच समीकरण नेहमी आपल्या डोळ्यासमोर असत. पण फक्त स्त्रियाच सुंदर असतात असं नाही तर पुरुषही सुंदर असतात, मोहक ,आकर्षक असतात किंवा वाटतात. निसर्गाने पुरुषांना दिलेली सौंदर्याची देणगी अनेक वेळा दुर्लक्षित केली जाते.तर द टिल मँगो यांनी 2021 जगातली सर्वात मोहक, हँडसम पुरुषांची यादी जाहीर केली आहे. भारतातुन एक नाव या यादीत आहे. हे आहेत TheTealMango २०२१ मधल्या जगातील टॉप ७ सर्वात सुंदर पुरुष..

1 किम ता-ह्युंग (BTS V)

अवघ्या २५ वयाचा दक्षिण कोरियामधला हा हँडसम तरुण V या नावाने ओळखला जातो. किम हा दक्षिण कोरियन प्रसिद्ध गायक, संगीतकार आणि अभिनेता आहे. तो संगीतकार म्हणून दक्षिण कोरियन बॉय बँड BTS चा एक भाग आहे. १३ जून २०१३ ला त्याने BTS चा एक कलाकार म्हणून पदार्पण केले. त्याचा पहिला सोलो अल्बम २ कूल ४ स्कूल होता. “नो मोअर ड्रीम” या गाण्याने सुरू झालेली ही कारकीर्द आज यशाच्या शिखरावर आहे. जगभरात मुली त्याला फॉलो करू लागल्या. त्याचे इंस्टाग्रामवर ६.३ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याचे न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कसह जगभरात शोज झाले आहेत. महत्वाचे म्हणजे इतका हँडसम मुलगा अजूनही सिंगल आहे..!

2 हृतिक रोशन

या यादीतले एकमेव भारतीय नाव हृतिक रोशन हे आहे. त्याला भारतात प्रेमाने ग्रीक गॉड देखील म्हणतात. त्याचा जन्म आहे १० जानेवारी १९७४ मध्ये झाला.एक मॉडेल आणि अभिनेता म्हणून तो बॉलिवूड चित्रपटांमध्ये सुपरस्टार आहे. २००० मध्ये ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाद्वारे सर्वात यशस्वी बॉलीवूड पदार्पण केले. त्यांनतर अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. घारे हिरवे डोळे, ६ पॅक्स, मनमोहक नृत्य, फिटनेस आणि चेहऱ्याचा उत्तम कट असा तो बॉलीवूड इंडस्ट्रीत सर्वात श्रीमंत मॉडेलदेखील आहे. बायकोशी घटस्फोट झाल्यामुळे तोही सध्या सिंगल आहे. TheTealMango ने हृतिक रोशनला जगातील दुसरा सर्वात देखणा माणूस म्हणून घोषित केले आहे.

3 रॉबर्ट पॅटिनसन

३५ वर्षीय रॉबर्ट पॅटिनसन हा युनायटेड किंगडममधील देखणा अभिनेता आहे. रॉबर्ट डग्लस थॉमस पॅटिनसन हे त्याचे पूर्ण नाव! त्याचा जन्म आहे १३ मे १९८६ चा असून वयाच्या १५ व्या वर्षी त्याने लंडन थिएटर क्लबमध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली. ब्लॉकबस्टर चित्रपट हॅरी पॉटर आणि द गॉब्लेट ऑफ फायरमध्ये सेड्रिक डिगोरी म्हणून, तसेच ट्वायलाइट सागा मालिकेमुळे तो जगभर प्रसिद्ध आहे. अभिनय तर तो करतोच, पण गिटार आणि कीबोर्डही मस्त वाजवतो. २०२१ मध्ये त्याचा जगातील तिसरा देखणा पुरुष म्हणून नंबर लागतो.

4 ब्रॅड पिट

अमेरिकेतला प्रसिद्ध अभिनेता ‘ब्रॅड पिट’ हे नाव सर्वांनाचं माहित आहे. त्याचे खरे नाव विल्यम ब्रॅडली पिट आहे. आता त्याचे वय ५७ वर्ष आहे. त्याचा जन्म १८ डिसेंबर १९६३ अमेरिकेत झाला. अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे. २०२० मध्ये ‘वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड’ या चित्रपटासाठी बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्टर श्रेणीत त्याने मानाचा ऑस्कर जिंकला असून अनेक हॉरर थ्रिलर मध्ये त्याने काम केले आहे. वयाच्या विसाव्या वर्षी करिअरला सुरुवात केली. त्याचे दोनदा लग्न झाले होते.२०१४ मध्ये जगातील सर्वात सुंदर महिला अँजेलिना जोलीशी लग्न केले आणि दोन वर्षांनी दोघांचा घटस्फोट झाला. वय झाले असूनही तो आजही तितकाच देखणा दिसतो .

5 टॉम क्रूझ

या यादीतले सर्वात तरुण नाव, वय वर्ष फक्त ५९! अमेरिकेन अभिनेता टॉम क्रूझ हा पूर्ण जगातल्या मुलींच्या गळ्यातल्या ताईत आहे. त्याचे पूर्ण नाव थॉमस क्रूझ मॅपोथर IV आहे. त्यांचा जन्म ३ जुलै १९६२ रोजी न्यूयॉर्कमधे झाला. १९८० च्या दशकाच्या सुरुवातीस त्यांनी विनोदी चित्रपटातून प्रमुख भूमिका करून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आतापर्यंत त्याने तीन गोल्डन ग्लोब्स आणि तीन अकादमी पुरस्कार नामांकनांसह अनेक पारितोषिके जिंकली आहेत. तो जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. टॉम क्रूझ अनेक वर्षांपासून जगातील सर्वात सुंदर पुरुषांच्या यादीत अव्वल स्थान मिळवत आहे. त्याचे मोहक हास्य आणि अभिनय पाहून जगभरातल्या तरुणी त्याच्या चित्रपटांची वाट पाहत असतात.

6 ओमर बोरकान अल गाला

हे चित्रपट क्षेत्राच्या बाहेरचे नाव असले तरी याचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. इराकचा हँडसम हंक ३१ वर्षाचा आहे.ओमर बोरकान अल गाला याचा जन्म बगदाद, इराक येथे २३ सप्टेंबर १९८९ रोजी झाला. तो कवी, मॉडेल, अभिनेता, ऑनलाइन सेलिब्रिटी आणि छायाचित्रकार आहे.
इंटरनॅशनल प्रेसने त्याला जगातील सर्वात सुंदर अरब माणूस म्हणून लेबल केले आहे. त्याचे तांबूस डोळे आणि आकर्षक चेहरा त्याला या यादीत ६ व्या नंबरवर आणतात. तो मध्य पूर्वेतील सर्वात आकर्षक पुरुष आहे.

7 ख्रिस इव्हान्स

कॅप्टन अमेरिका म्हणलं की आठवतो तो यातील देखणा अभिनेता ख्रिस इव्हास मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स (MCU) चित्रपटांच्या मालिकेत ४० वर्षीय ख्रिस इव्हान्स कॅप्टन अमेरिका म्हणून जगभरात पोहोचला. या अमेरिकन अभिनेत्याचा जन्म १३ जून १९८२ रोजी बोस्टन, मॅसॅच्युसेट्स, येथे झाला. त्याने २००० मध्ये ओपोजिट सेक्स सारख्या टेलिव्हिजन शोमध्ये अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली. तो एक हँडसम , देखणा अभिनेता आहेच तसेच त्याला विनोदाची उत्तम जाण आहे. अनेक मुलाखतींमधून त्याचा हरजबाबीपणा आणि खेळकर स्वभाव तरुणींना भुरळ पाडून गेला आहे.

सर्वात सेक्सी पुरुष

आता पाहू या आता नं आहे जगातील सर्वात सेक्सी पुरुष…आणि तो आहे फ्रेंड्समधल्या फीबीचा नवरा आणि आपला अँट-मॅन पॉल रड.. PEOPLE’s 2021 ने जगातला यावर्षीचा सर्वात सेक्सी पुरुष हा किताब बहाल केलाय. या अमेरिकन अभिनेत्याचं आजचं वय आहे ५२ वर्षे!! आणि या उपाधीने त्याला आणि त्याच्या बायकोलाही बुचकळ्यात टाकलंय असं त्याचं म्हणणं आहे.
असो. या जागतिक यादीत एकतरी भारतीय नाव आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button