अहमदनगर

वडुले येथे विरभद्र यात्रा महोत्सव साजरा

वडुले येथे विरभद्र यात्रा महोत्सव साजरा

सुनील नजन
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील वडुले खुर्द येथिल तुतारे वस्तीवरील विरभद्र मंदिरात यात्रा महोत्सव साजरा करण्यात आला. भजन,किर्तन, धनगरी न्रुत्य,ओवीगायन, डफांच्या वाद्यांचा गजर, जलाभिषेक, काठी मिरवणूक, अन्नदान,ई.कार्यक्रम पार पडले, राहूरी तालुक्यातील बिरोबा भक्त एकनाथ खाटेकर यांनी आगामी वर्षाचे भाकित कथन केले ते पुढील प्रमाणे गहू, हरबरे, पांढरे धांन्य जोरात येईल.कांद्याचे भाव उच्चांक गाठतील.आणि ओला दुष्काळ पडेल.थंडीची लाट येईल.पुढील वर्षी जठुड साधेल.सरकार स्थापन करण्यासाठी अडचणी येतील व रस्सीखेच होईल. गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत धुमाकूळ माजेल.युद्धाचा प्रसंग येईल.पशुपक्षी मात्र आनंदाने राहतील अशी भविष्यवाणी वर्तविण्यात आली होती. या वेळी मीरी येथील बिरोबा भक्त सिताराम भगत,आसाराम भगत,महादेव तुतारे(भगत),राजेंद्र वीर,मारूती हरिभाऊ तुतारे,तुकाराम भगत आणि तुतारे वस्तीवरील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button