अहमदनगर

जनशक्ती मंचाच्या आँनलाईन सेवा सुविधा केंद्राचे उद्घाटन थाटात संपन्न

जनशक्ती मंचाच्या आँनलाईन सेवा सुविधा केंद्राचे उद्घाटन थाटात संपन्न

सुनील नजन

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे जनशक्ती विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. त्या बैठकीच्या अध्यक्ष स्थानी अशोकराव दातिरसर होते.जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष अँड.शिवाजीराव काकडे यांनी शेवगाव तालुक्यातील गणनिहाय ,व बुथनिहाय काही गावात नवीन कार्यकर्त्यांच्या निवडी केल्या त्यामुळे त्यांना सन्मानित करण्यात आले.तसेच गोरगरिबांना अल्प खर्चात दैनंदिन व्यवहारात लागणारे दाखले उपलब्ध व्हावे यासाठी आँनलाईन सेवा सुविधा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.सर्व सामांन्य जनतेचे कामे वेळेवर व्हावे यासाठी हा प्रयत्न केला आहे. तसेच दिपावलीच्या मुहूर्तावर उपस्थितांना फराळाचेही वाटप करण्यात आले. या वेळी संजय आंधळे,सुरेश चौधरी, आबासाहेब राउत, शंकर पाटील, माणिक गर्जे, सुनिल काकडे,यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.गाव तेथे जनशक्ती आघाडीची शाखा स्थापन करण्यात येणार आहे.या प्रसंगी संपूर्ण शेवगाव तालुक्यातील अनेक गावातील निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते. जि.प.सदस्य सौ हर्षदाताई काकडे यांनी आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button