Maharashtra

पंचायत समिती समोर धरणे आंदोलन चा संगणक परिचालक संघटना याने दिला इशारा…

पंचायत समिती समोर धरणे आंदोलन चा संगणक परिचालक संघटना याने दिला इशारा… 

पंचायत समिती समोर धरणे आंदोलन चा संगणक परिचालक संघटना याने दिला इशारा...

पेठ प्रतिनिधी शैलेश राऊत
संग्राम व आपले सरकार सेवा या प्रकल्पाच्या माध्यमातून मागील ८ वर्षांपासून महराष्ट्रातील ग्रामीण जनतेला शकडो सेवा देऊन डिजिटल महाराष्ट्र साकार करण्याचे काम संगणक परिचालक प्रामाणिकपणे करत आहेत, तरी डिजिटल महाराष्ट्र करणाऱ्या संगणक परिचालक हे पद कायमस्वरूपी भरण्याची आवश्यकता असताना. शासनाने या महत्वाच्या निर्णयाकडे वारंवार दुर्लक्ष केले आहे. या मुळे दी. १९ ऑगस्ट २०१९ पासून बेमुदत आंदोलनावर जाऊन तरी शासनाने लक्ष दिलेले नाही. म्हणून राज्यातील सर्व पंचायत समिती समोर धरणे आंदोलन दी. २८ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील ६ कोटी जनतेचे अनेक प्रकारचे ऑनलाईन कामे तसेच सद्याचे युग डिजिटल असल्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायत मधे संगणक परिचालक याची कायम स्वरुपी शासणकडून नियुक्ती करणे अत्यंत आवश्यक असताना शासन वारंवार बोगस कंपन्यांची नियुक्ती या आपले सरकार प्रकल्पासाठी करते. या कंपन्या जनतेचा हक्काचा शासनाचा निधी हडप करून भ्रष्टाचार करत आहेत. त्याकडे शासनाकडे वारंवार तक्रार करूनही शासनाने त्यावर काहीच कारवाई केली नाही. म्हणून आमचा मागण्या लवकर पूर्ण कराव्या आणि म्हणून २८ तारखेला धरणे आंदोलन पंचायत समिती समोर करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. या विषयी मा. गटविकास अधिकारी श्री. अनिल नागणे साहेब यांना निवेदन देताना  तालुकाध्यक्ष प्रकाश महाले, सचिव मंगेश गवळी, प्रसिद्धी प्रमुख शैलेश राऊत सल्लागार भगवान इंपाळ केंद्रचालक शांताराम गायकवाड, देवदत्त भगरे,वामन दरोडे, सीताराम कामडी, हौसाताई भोये आदी. उपस्थित  होते.
संगणक परिचालक यांचा प्रमुख मागण्या _
* राज्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद परिचालक यांना आय. टी महामंडळाकडून संगणक परिचालक म्हणून कायम नियुक्ती देणे
* सर्व संगणक परिचालक यांचे मानधन १४ वित्त आयोगातून न देता राज्य शासनाचा निधीतून प्रती महिना किमान १५००० वेतन देण्यात यावे.
* सर्व संगणक परीचालकांचे २०१७ ते जुलै २०१९ पर्यंतचे सर्व थकीत मानधन देणे. 
* रिम व टोनर प्रत्येक महिन्याला मिळणे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button