अहमदनगर

सत्तेचा वापर तळागाळातील जनतेने प्रश्न सोडवण्यासाठी करणार नवनिर्वाचित आमदार प्राजक्त दादा तनपुरे

सत्तेचा वापर तळागाळातील जनतेने प्रश्न सोडवण्यासाठी करणार नवनिर्वाचित आमदार प्राजक्त दादा तनपुरे

सुनील नजन

सत्तेचा वापर कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून कोणाची जिरवा जिरवी करून कोणाला निट करण्यासाठी नाही तर, सत्तेचा वापर तळागाळातील जनतेने प्रश्न सोडवण्यासाठी करणार असल्याचे प्रतिपादन राहुरी-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांनी केले ते तिसगाव येथील जाहीर आभार सभेत बोलत होते.तत्पूर्वी आ.तनपुरे यांनी पाथर्डी येथील पंचायत समितीच्या कार्यालयात जाऊन तिसगाव नळ पाणी पुरवठा योजनेच्या संदर्भात अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.रोज तिन लाख लिटर पाणी पुरवठा करण्याची क्षमता असताना प्रत्यक्षात दिड लाख लिटरच पाणी मिळते अशी धक्कादायक माहिती मिळाली मग बाकीचे पाणी कोठे जाते याची माहिती सादर करा.पाणी चोरणाराची कसलीच लुडबुड खपवून घेतली जाणार नाही असा ईशारा संबंधीत अधिकाऱ्यांना आ. तनपुरे यांनी दिला.सामांन्य जनतेने आमदारकीची सत्ता विश्वासान माझ्या हाती दिली पण माझ्या डोक्यात सत्तेची हवा कधीच जाणार नाही तर मी माझे पाय सतत जमिनीवर ठेऊनच चालणार असल्याचे आ.प्राजक्तदादा तनपुरे यांनी सांगितले.यावेळी तिसगावचे ग्रामस्थ नितीन लवांडे, आबा काळे,बाबा पुढारी, राजेंद्र म्हस्के सराफ,ईलियास शेख यांनी तिसगावातील अनेक समस्या मांडल्या.तिसगाव येथे जनसंपर्क कार्यालय सुरु करावे अशीही मागणी करण्यात आली. या आभार सभेस संजय लवांडे, अनिल रांधवणे,अविनाश नरवडे,प्रदिप ससाणे, भाऊसाहेब लवांडे, अशोक कदम,विजय टापरे,सुरेश निमसे,गणेश घाडगे,अभिजित घाडगे,रफिक शेख यांच्या सह तिसगाव परिसरातील अनेक कार्यकर्ते ऊपस्थीत होते. प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर जिल्हा

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button