अहमदनगर

मिरी-शंकरवाडी तलावात वांबोरी पाईपलाईनचे शेतीसाठी पाणी सोडावे—जेष्ठनेते राजूमामा तागड यांची मागणी

मिरी-शंकरवाडी तलावात वांबोरी पाईपलाईनचे शेतीसाठी पाणी सोडावे—जेष्ठनेते राजूमामा तागड यांची मागणी

सुनील नजन
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मीरी घोडेगाव रस्त्यावरील गावठाणातील ६९ नंबरचा आणि शंकरवाडी शिवारातील ७२ नंबर चा तलाव वांबोरी पाईपलाईन (मीरी तिसगाव पाणी पुरवठा) योजनेद्वारे भरावा अशी मागणी जेष्ट नेते राजुमामा तागड यांनी केली आहे. वांबोरी पाईपलाईन द्वारे राहुरी, नेवासा, पाथर्डी तालुक्यातील एकुण १०८ (बंधारे) तलाव भरले जातात करंजी गणात सर्वत्र पाणी पोहोचले आहे परंतु मीरी गणात काही विघ्नसंतोषी लोकामुळे बंधारा क्र.६९ मीरी गावठाण शिवारआणि शंकरवाडी शिवारातील बंधारा क्र. ७२ या दोन बंधाऱ्यात पाणी पोहोचलेच नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे, नवनिर्वाचित खासदार सुजयदादा विखे यांनी प्रवरा कारखान्याच्या सुरक्षा यंत्रणे मार्फत पाणी पुरवठा सुरळीतपणे केला होता. नवनिर्वाचित आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांनीही आभार सभेत पाणी वाटपात गैरकारभार करणाऱ्या अधिकाऱ्याची गय करणार नाही असा ईशारा देऊनही मीरी-तिसगाव पाणी पुरवठा योजनेचे पाणी काही ठिकाणी आडमुठ्या शेतकऱ्यांनी फोडून घेतल्यामुळे या पाणीपुरवठा योजनेचे तीनतेरा वाजून प्रशासनाचा पुर्ण बोजवारा उडाला आहे. निर्ढावलेला अधिकारीवर्ग अजूनही काही ठिकाणी जाऊन लक्ष देत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना आता मात्र कोणीच वाली राहिला नाही असे तनपुरे/ विखे समर्थक जेष्ट नेते राजुमामा तागड यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button