अहमदनगर

अहमदनगर जिल्हा वंचित आघाडीचा आभारमेळावा शेवगाव येथे संपन्न

अहमदनगर जिल्हा वंचित आघाडीचा आभारमेळावा शेवगाव येथे संपन्न

अहमदनगर जिल्हा वंचित आघाडीचा आभारमेळावा शेवगाव येथे संपन्न, मेळाव्यात सामांन्य जनतेसाठी संघर्ष करण्यास सुरूवात, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून तहसीलवर मोर्चा वळवला

सुनिल नजन

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी विधानसभा निवडणुकीतील वंचित आघाडीचे पराभूत उमेदवार पा.किसनराव चव्हाण यांनी शेवगाव येथील ममता लाँन येथे कार्यकर्त्यांचा आभार मेळावा घेतला. भविष्यात गाव तेथे वंचितची शाखा स्थापन करून सर्व सामांन्य जनतेच्या प्रश्नावर लढा उभारला जाणार असल्याचे प्रा.चव्हाण यांनी सांगितले.प्रारंभी अँड. अनिल पैलवान,सुनिल जाधव,पोपट कोल्हे,ज्ञानेश्वर धायतडक,शिवाजी माने,किरण चव्हाण, अशोक दळवी, बाबासाहेब रंधवे,सुभाष काळे,जयहिंद खेडकर, बाळासाहेब काळपुंड,भानुदास गायकवाड, विनायक देशमुख, अरविंद सोनटक्के, रुपचंद गायकवाड, शेवगाव तालुका अध्यक्ष प्यारेलाल शेख,यांनी आपले विचार व्यक्त केले.

सर्व जणांनी ग्रामपंचायत निवडणूकीपासुन तर थेट खासदारकी पर्यंतच्या सर्व निवडणूका लढवणार असल्याचे सांगितले. यावेळी विष्णु वीर,मच्छिंद्र उघडे,सोपान आव्हाड,यांच्या सह शेवगाव -पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील अनेक नेते उपस्थित होते. अहमदनगर जिल्हा वंचित आघाडीचा आभारमेळावा शेवगाव येथे संपन्न, मेळाव्यात सामांन्य जनतेसाठी संघर्ष करण्यास सुरूवात, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून तहसीलवर मोर्चा वळवला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button