अहमदनगर

आमदार प्राजक्त तनपुरेचे पाथर्डीच्या 39 गावात वाजत गाजत जोरदारपणे स्वागत,

आमदार प्राजक्त तनपुरेचे पाथर्डीच्या 39 गावात वाजत गाजत जोरदारपणे स्वागत,

सुनील नजन

दहा वर्षाच्या काळात मागील आमदारांनी केलेल्या चुकांची लोकांनी केली ऊजळणी
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात रूपेवाडी, मीरी, आडगाव, कामतशिंगवे,मोहोज,या ३९ गावांना आ.तनपुरे यांनी आभार दौरा काढून भेटी दिल्या त्यावेळी गेल्या दहा वर्षाच्या काळात मागील भाजपच्या आमदारांनी चुकीच्या पद्धतीने जी कामे केली त्या सर्व कामाची उजळणी लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांच्या समोर मांडली.सर्व गावात पिण्याच्या पाण्याची कशी बोंबाबोंब आहे याची आमदार महोदयांना जाणीव करून देण्यात आली.पिण्याच्या पाण्याची कोठेकोठे चोरी होत आहे तेही सांगितले.मागिल दहा वर्षातला सारा कारभार पाहून नवनिर्वाचित आमदारही अवाक् झाले. भविष्यात साऱ्याच चुकांचा विधानसभेत आवाज उठवून दुरुस्ती करू अशी ग्वाही आ.तनपुरे यांनी दिली.या आभार दौऱ्यात जेष्ठ नेते राजुमामा तागड,राहुरी बाजार समितीचे ऊपसभापती अण्णासाहेब बाचकर,पाथर्डी पंचायत समितीचे माजीसभापती संभाजीराव पालवे,जि.प.सदस्य अनिल कराळे,माजी जि.प.अध्यक्ष बाबासाहेब भिटे,शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख रफिक शेख,एकनाथ तनपुरे,धिरज पानसंबळ, मच्छिंद्र सोनवणे, ऊद्धव दुसंग, नामदेव सोलाट,महेंद्र सोलाट,विजय गवळी,माणिक गवळी,आदिनाथ सोलाट, काळू मिरपगार,साईनाथ कोरडे यांच्यासह अनेक गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button