Bid

लहान मुलाचे अपहरण करून पळून जाणाऱ्या वाहनाचा सिनेस्टाईलने पाठलाग करताना अपहरण करणाऱ्या वाहनाचा अपघात दोन ठार चार जखमी,वाहनचालक पोलीसांच्या ताब्यात?

लहान मुलाचे अपहरण करून पळून जाणाऱ्या वाहनाचा सिनेस्टाईलने पाठलाग करताना अपहरण करणाऱ्या वाहनाचा अपघात दोन ठार चार जखमी,वाहनचालक पोलीसांच्या ताब्यात?

बीड : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सावरगाव येथील मच्छिंद्रनाथ(मायंबा) गडावरील गोशाळेतील कामगार दिलिप सुभाष भगत यांचा मुलगा चैतन्य दिलिप भगत( वयवर्षे१४)हा गावाकडून शेताकडे रस्त्याच्या कडेने जात असताना पाठीमागून आलेल्या MH16 BH 2389 या ईरटींगा गाडीतून आलेल्या तिघांनी चैतन्यला बळजबरीने ओढुन गाडीत बसवीत जबरदस्त मारहाण करून त्याच्या जवळील मोबाईल आणि गळ्यातील सोन्याचा ओम काढूनघेतल्या नंतर हातपाय बांधून व्रुद्धेश्वर घाटातील गोशाळेजवळ टाकून दिले.लोकांनी या गाडीचा पाठलाग केल्यानंतर ही गाडी घाटशिरस- मढी मार्गे तिसगावातील आशिर्वाद मंगलकार्यालया जवळ रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या रमेश साहेबराव नरवडे रा.तिसगाव ता.पाथर्डी जि.अहमदनगर यांना जोरदार धडक देऊन ठार करून तिसगाव बसस्थानकाकडे सुसाट वेगाने आली संगम मेडिकल समोरून गंगाराम सुर्यभान बुधवंत रा.शिरापूर ता.पाथर्डी आणि बाळासाहेब बंन्सी केदार रा.हत्राळ हे दोघे MH 12 JE 6706 या दुचाकीवरून जात असताना MH 16 BH 2389 या गाडीने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील गंगाराम सुर्यभान बुधवंत रा.शिरापूर ता.पाथर्डी हे जागीच ठार झाले तर बाळासाहेब बंन्सी केदार हे जखमी झाले. नंतर या गाडीने प्रकाश पंढरीनाथ लवांडे रा.मांडवे ता.पाथर्डी यांच्या MH16 AT 4190या गाडीस जोरदार धडक दिली.या धडकेत प्रकाश लवांडे व सचिन घोरपडे हे जखमी झाले.लवांडे यांच्या नगरच्या दिशेने जाणऱ्या वाहनाचे तोंड पाथर्डी कडे झाले होउन गाडीचे प्रचंड नुकसान झाले . नंतर ही गाडी युसुफ पठाण यांच्या साई रिपेरींग सेंटर मध्ये घुसून दुकानाचे प्रचंड नुकसान झाले होते. अपघातानंतर अपहरण कर्ते गाडी रस्त्यात टाकून पसार झालेहोते.गाडी चालक अजय पिराजी पवार हा संगम ज्वेलर्स च्या पाठीमागिल संडासातील हौदात लपून बसला होता त्यास संतप्त जमावाने चांगला चोप देत पोलिसांच्या हवाली केले. त्यावेळी मायंबा येथे हातपाय बांधून टाकलेला चैतन्य दिलीप भगत तिसगावात हजर झाला. त्याने अजय पिराजी पवार यास ओळखले व त्यास अजून दोन साथीदार असल्याचे सांगितले. आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस आणि महाराष्ट्र राज्याचे आदिवासी, उर्जा, नगरविकास मंत्री ना.प्राजक्तदादा तनपुरे यांनी पाथर्डी पोलिसांना चांगलेच धारेवर धरले. तपासात हलगर्जीपणा चालणार नाही तपास योग्य दिशेने करण्याच्या सुचना दिल्या. या अपघातानंतर तिसगावातील वाहतूक व्यवस्था तीन तास ठप्प झाली होती. दोन्ही बाजूनी वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. पाथर्डीचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, पो.काँ.भगवान सानप,खेडकर,यांनी चोख बंदोबस्त ठेवला. चैतन्य भगत हा शाळकरी मुलगा होता त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांत भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात वाहनचालक अजय पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर अजय पवार याला मारहाण करणाऱ्या च्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर जिल्हा

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button