Bid

देशाला स्वातंत्र्य मिळून ७४वर्षे पूर्ण झाली,तरीही पाथर्डी तालुक्यातील गाडेवाडीतील शिंदे वस्ती अजुनही चिखलातच गाडलेली? सामांन्य जनता विकासापासून कोसोमैल दूर

देशाला स्वातंत्र्य मिळून ७४वर्षे पूर्ण झाली,तरीही पाथर्डी तालुक्यातील गाडेवाडीतील शिंदे वस्ती अजुनही चिखलातच गाडलेली? सामांन्य जनता विकासापासून कोसोमैल दूर

बीड : बीड आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरील पाथर्डी तालुक्यातील टाकळीमानुर ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या गाडेवाडीतील दुर्लक्षित शिंदेवस्ती वरील जनतेचे रस्त्याविना अतिशय हाल होत आहेत. कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली असा कांगावा करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे यामुळे पितळ उघडे पडले आहे.देशाला स्वातंत्र्य मिळून ७४वर्षे पूर्ण झाली तरीही आज पर्यंत या गाडेवाडीतील लोकांना पायी जाण्यासाठी रस्ता नाही ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. पाथर्डीच्या तहसीलदारांना रस्त्याच्या कामासाठी अनेक वेळा निवेदन देण्यात आलीआहेत पण सदर निवेदनाला केराची टोपली दाखवन्यात आली आहे. गरीब जनतेला कोणीही वाली राहिलेला नाही.निवडणूक काळात लबाड पुढारी मतदानासाठी रस्ता करण्याचे बोगस आश्वासन देतात आणि निवडून गेल्या नंतर ढुंकूनही पहात नाहीत असे या भागातील जनतेचे म्हणणेआहे.अखेर या साऱ्या गोष्टीला कंटाळलेल्या शिंदे वस्तीवरील बाळासाहेब शिंदे, मच्छिंद्र शिंदे, तुळशिराम शिंदे,बापुराव शिंदे,सुखदेव शिंदे, माणिक शिंदे, देविदास शिंदे,सुधाकर शिंदे, भाउसाहेब शिंदे,योगेश शिंदे, आदिनाथ शिंदे,सोमनाथ शिंदे, गोरक्ष शिंदे, बंडू घोडके इत्यादी
सोळा कुटुंबातील ग्रामस्थांनी लोकवर्गणी करून एक कि.मी.पैकी ९०० मीटरपर्यंत लांबीचा रस्ता पुर्ण केला आहे.परंतु शेवटचा १०० मिटरच्या आसपासचा रस्ता रस्त्यालगतच्या काही शेतकऱ्यांनी आडमुठेपणाची भुमिका घेऊन रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण केल्यामुळे उर्वरित रस्ता अपुर्ण राहिला आहे. आमदार,पाथर्डीचे पोलीस निरीक्षक, तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात संबंधित आडमुठेपणाची भुमिका घेतलेल्या शेतकऱ्यांची नावे नमूद करण्यात आली आहेत. आडमुठेपणाची भुमिका घेतलेल्या शेतकऱ्यांच्या विरोधात पाथर्डीचे तहसीलदार नेमकी काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. शासकीय निधी न मिळालेल्या जनतेने लोकवर्गणीतुन रस्ता तयार करून संबंधीत लोकप्रतिनिधीच्या डोळ्यात झनझनीत अंजन घातले आहे. टाकळीमानुर ते करोडी या रस्त्यावरही असंख्य खड्डे पडले आहेत. प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर जिल्हा.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button