Bid

धक्कादायक…शिक्षकाचे प्रताप..मुलासाठी “इतक्या” वेळा करायला लावला पत्नीला गर्भपात…

धक्कादायक…शिक्षकाचे प्रताप..मुलासाठी “इतक्या” वेळा करायला लावला पत्नीला गर्भपात…

बीड मुलाच्या हव्यासापोटी शिक्षक पतीने चक्क 7 वेळा बळजबरीने गोळ्या चारून पत्नीचा गर्भपात केल्याची धक्कादायक घटना बीड इथे उघडकीस आली असून पेशाने शिक्षक असलेल्या या पतीवर गुन्हा दाखल झाला आहे. शिक्षक म्हणून मिरवणाऱ्या व्यक्तीने मुलाच्या हव्यासापोटी पत्नीचा तब्बल 7 वेळा गर्भपात केल्याचं समोर आले असून खुद्द पीडित विवाहितेने पोलिसांत तक्रार दिली आहे. बीडच्या चौसाळा गावांमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचा विवाह बीडच्या चौसाळा येथील शिक्षक फेरोज शेख याच्याशी 2008 मध्ये झाला होता. या दरम्यान 2011 ला एक मुलगी झाली. तेव्हा हे पहिले तीन वर्ष सुखात संसार झाला. मात्र त्यानंतर आता मुलगाच हवा यासाठी पीडितेचा छळ सुरू झाला.एकीकडे पीडित महिलेचा छळ सुरु झाला तर दुसरीकडे त्याचे एका दुसऱ्या शिक्षक महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचं देखील समोर आलं.

पीडित महिला यावरून विरोध करू लागल्याने तिचा आणखी छळ सुरू झाला. 2012 ते 2019 पर्यंत पती फेरोज याने एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 7 वेळा पीडितेचा मुलाच्या हव्यासापोटी गर्भपात केला. गर्भपाताला विरोध दर्शविल्याने पती फिरोजकडून मारहाण केली जात असे. गर्भखाली व्हावा, यासाठी बळजबरीने गोळ्या देखील तो खाऊ घालत असे .पती आणि सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे.

संबंधित लेख

Back to top button