Amalner

? Big Breaking…अखेर अमळनेरचा दगडी दरवाजा जतन व दुरुस्तीसाठी अमळनेर नगरपरिषदेकडे झाला हस्तांतरीत…वाहतुकीची समस्या सुटणार..

अखेर अमळनेरचा दगडी दरवाजा जतन व दुरुस्तीसाठी अमळनेर नगरपरिषदेकडे झाला हस्तांतरीत…वाहतुकीची समस्या सुटणार..

पुरातत्व विभागाने दिली परवानगी….आ.अनिल पाटलांच्या प्रयत्नांना यश,न.प.तर्फे नगराध्यक्षांनी केली होती मागणी

नव्या डिझाइन नुसार होणार नुतनीकरण,रस्ता होणार मोकळा,वाहतुकीची सुटणार समस्या

अमळनेर-शहरातील राज्य संरक्षित स्मारक तथा दगडी दरवाजा अमळनेर न. प.कडे हस्तांतरीत व्हावा अशी संपूर्ण अमळनेरांची इच्छा व विद्यमान पालिका पदाधिकारी यांचे तसे जोरदार प्रयत्न देखील असतांना या प्रयत्नांना अखेर यश आले असून यासंदर्भात आ.अनिल पाटील यांनी स्वतः जातीने डोळ्यात तेल घालून शासन दरबारी जोमाने पाठपुरावा केल्याने पुरातत्व विभागाने सदरचे स्मारक 10 वर्षांसाठी हस्तांतरण करण्यास अधिकृत परवानगी दिली आहे.

यासंदर्भात पुरातत्व व वस्तुसंग्रहालयाचे संचालक डॉ.तेजस मगन गर्गे यांनी परवानगी देण्याबाबत लेखी पत्र अमळनेर न.प.च्या मुख्याधिकारी यांना दिले असून यात सदर स्मारक जतन, संगोपन आणि दुरुस्तीसाठी 10 वर्षांच्या कालावधीसाठी अमळनेर पालिकेस देण्यात येत असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालकांकडे पाठपुरावा सुरू होता. याबाबत पुरातत्व विभागाच्या संचालकांनी पालिकेस दिलेल्या परवानगी पत्रात म्हटले आहे की, अमळनेर येथील राज्य संरक्षित स्मारक महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षित स्मारक संगोपन’ योजनेअंतर्गत नगरपरिषद अमळनेर यांना 10 वर्ष कालावधीकरिता संगोपनासाठी देण्यात आले आहे. अमळनेर वेस मुख्य रस्त्यावर असून स्मारकाच्या पूर्वेकडील बुरुजाचा काही भाग दिनांक 24 जुलै 2019 रोजी ढासळल्यामुळे सध्या तेथील मलबा हटवून मातीने भरलेल्या गोण्या रचण्यात आल्या आहेत. सदर वेस मुख्य रस्त्यावर असल्यामुळे नेहमी याठिकाणी वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. येथे कोणतीही जिवीत व वित्त हानी होऊ नये याकरीता नगरपरिषद अमळनेर यांनी अमळनेर शहराचा विकास योजनेनुसार सदर वेसचे जतन दुरुस्ती करणेकरिता संदर्भ पत्रान्वये परवानगी मागितली आहे.

अमळनेर वेसची पडझड होऊन तो क्षितिग्रस्त होऊ नये याकरिता नगरपरिषदेने या विभागाच्या नामिकासुचीतील वास्तुविशारद मे चेतन व्ही. सोनार अमळनेर यांचेकडून सहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग, नाशिक यांनी दिलेल्या सूचनेनुसार सुधारित सविस्तर अंदाजपत्रक व नकाशे तयार केले आहेत. अमळनेर वेस या राज्य संरक्षित स्मारकाची जतन दुरुस्ती करणे आवश्यक आहे. अन्यथा सदर स्मारक पूर्ण क्षतीग्रस्त होऊन मुख्य रस्त्यावरील वाहतूक वर्दळीमुळे जीवित हानी होऊ शकते. त्यामुळे सदर प्रस्तावास अटींच्या अधिन राहून परवानगी देण्यात येत असल्याचे या पत्रात म्हटले आहे. सदरची परवानगी ‘महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षक स्मारक संगोपन’ योजनेअंतर्गत झालेल्या करारातील अटीच्या अधिन राहून देण्यात आली आहे असे डॉ.तेजस मदन गर्गे सहाय्यक संचालक, पुरातत्त्व विभाग यांनी म्हटले आहे.

आ.अनिल पाटलांचा यशस्वी पाठपुरावा

माजी आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या सूचनेनुसार अमळनेर पालिकेने दगडी दरवाजा हस्तांतरण करण्याची केलेली मागणी योग्य आणि जनहीताची व अमळनेर शहराच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असल्याने आ.अनिल पाटील यांनी ही मागणी प्रतिष्ठेची करून सतत पाठपुरावा केला. प्रत्यक्षात पुरातत्व विभागाकडून कोणतीही जुनी वास्तू दुसऱ्या संस्थेला जतन म्हणून देणे हे अत्यंत अवघड आणि अशक्य काम होते, परंतु पुरातत्व विभागाकडून या बुरुजाची लवकर दुरुस्ती होणे अवघड असल्याने व हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाल्याने शहरात मुख्य मार्गावर वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होऊन येथील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविल्याने शहरी रस्त्याचे तीनतेरा वाजले होते. यामुळे कोणत्याही परिस्थितीत लवकर या बुरुजाची दुरुस्ती व्हावी म्हणून हे स्मारक पालिकेकडे येणे आवश्यक होते. आ.अनिल पाटलांच्या प्रयत्नांना यश आल्याने अमळनेरकर सुखावले असून नगराध्यक्षांसह सर्व पालिका पदाधिकारी व जनतेने शासनासह आ.अनिल पाटील आणि माजी आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.

दरवाजा नूतनीकरणाचे संकेत

सदर बुरुज पालिकेकडे आल्याने आता या दरवाजाचे नव्याने डिझाइन तयार होऊन आधुनिक पद्धतीने नुतनीकरण होण्याचे संकेत मिळाले आहेत. या व्यतिरिक्त राज्य मार्गवर हे स्मारक असतांना येथील रस्ता बुरुजामुळे केवळ सात मीटरचा झाला असून इतर ठिकाणी हा रस्ता 14 मीटरचा आहे. यामुळे सदर ठिकाणी देखील रस्ता 14 मीटरचा होणार असल्याने वाहतुकीची होणारी समस्या कायमस्वरूपी सुटणार आहे. पालिका पदाधिकारी तातडीने या कामास लागणार असून यासाठी आमदारांची मदत घेतली जाणार आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button