Bid

आत्मदहन करण्यास आलेले पती-पत्नी पोलिसांच्या ताब्यात..

आत्मदहन करण्यास आलेले पती-पत्नी पोलिसांच्या ताब्यात..

बीड : कोळगाव येथील शीतल सोमनाथ मदने या मुलीने ४ मे २०२१ रोजी आबासाहेब मदने, अशोक पांगरे, शहादेव लकडे यांच्या जाचास कंटाळून आत्महत्या केली.

याबाबत संबंधितांविरोधात तक्रारही दाखल करण्यात आलेली आहे, मात्र या प्रकरणी कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.

आरोपींवर कारवाईच्या मागणीसाठी मुलीचे पिता सोमनाथ मदने यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.

त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात मदने दाम्पत्य आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी मदने यांनी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button