Bid

पत्नी कीर्तनाला गेल्यानं पतीची कीर्तनस्थळी दगडफेक

पत्नी कीर्तनाला गेल्यानं पतीची कीर्तनस्थळी दगडफेक

बीड : पत्नी कीर्तन ऐकायला गेली म्हणून संतप्त झालेल्या पतीने भर कीर्तनात दगडफेक व तलवारबाजी करून गोंधळ घातल्याचा प्रकार तालुक्यातील मालेवाडी येथे घडला आहे.

या प्रकारात मारहाण झालेल्या पत्नीसह सोडवा-सोडवी करणाऱ्या अन्य चार जणांना दुखापत झाली आहे.

या प्रकरणी या पिडीत महिलेनेच पती विरोधात फिर्याद दाखल केली असुन परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात दि.६ रोजी रात्री ११.४७ वा.गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, परळी पासुन जवळच असलेल्या मालेवाडी येथे मारोती मंदिरात कीर्तनाचा कार्यक्रम होता.

व्याकरणाचार्य ह.भ.प अर्जुन महाराज लाड गुरुजी यांचे किर्तन सुरु होते. यावेळी इतरांनी भांडण सोडवासोडवी करायचा प्रयत्न केला असता संतप्त होत त्याने दगड फेकुन मारले.

तसेच हातातील शस्त्र फिरवु लागला या झटापटीत साक्षीदार सुदामा पंडीतराव आंधळे, सरपंच भुराज वैजनाथ बदने, आदिनाथ संभाजी बदने, भरत रामकिसन आंधळे यांनाही दुखापत झाली.

या प्रकरणी पत्नीनेच फिर्याद दिल्यावरुन आरोपी पती विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button