Bid

जिल्हा रुग्णालयात निवासी वैद्यकीय डॉ. सुखदेव राठोडांचा मनमानी कारभार

जिल्हा रुग्णालयात निवासी वैद्यकीय डॉ. सुखदेव राठोडांचा मनमानी कारभार

बीड : जिल्हा रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुखदेव राठोड हे अनेक कामात स्वत:चा मनमानी कारभार करतात. काही ठिकाणी जिल्हा शल्यचिकित्सकांना अंधारात ठेवून स्वत:च निर्णय घेतात.

काही दिवसापूर्वी केला असून शासकीय आयटीआय या ठिकाणी हॉस्पिटल मॅनेजर म्हणून काम करणार्‍या श्रीमती जाधवर यांना कोणतेही कारण नसताना कामावरून कमी केले आहे. श्रीमती जाधवर या अतिशय गरीब कुटुंबातील असल्याने त्यांच्या उपजिविकेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

श्रीमती राजश्री अभिमान जाधवर या ४ जूनपासून शासकीय आयटीआय या ठिकाणी हॉस्पिटल मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांनी यापूर्वी पाटोदा या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयामध्ये काम केले आहे.

त्यांचे काम चांगले असताना आणि सर्व शैक्षणिक पात्रता असताना सुद्धा राठोड आणि डॉ. शहाणे यांच्या मर्जीतील व्यक्तीला हॉस्पिटल मॅनेजर या पदावर घेण्यासाठी कोणतीही नोटीस न देता जाधवर यांना कामावरून कमी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button