Motha Waghoda

मोठे वाघोदा येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा ….

मोठे वाघोदा येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा ….

प्रतिनिधी.मुबारक तडवी

मोठा वाघोदा /-रावेर तालुक्यातील मोठा येथे आज प्रकाश विद्यालय जुनियर कॉलेज व गोपालकृष्ण वाचनालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.त्यावेळी प्रथम कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.प्रकाश विद्यालयातील विद्यार्थ्यांना शिक्षकातर्फे मराठी भाषेच्या दिवसाचे महत्त्व व मराठी भाषेचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले त्या वेळी प्रकाश विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. व्ही. व्ही.पाटील सर, पर्यवेक्षक श्री. व्हि.एस.महाजन सर,श्री.जे.आर.पाटील सर,श्री. व्हीं. बी.बाऱ्हे सर.आणि अमित सर .एम एम पाटील सर व सर्व शिक्षक शिक्षिका व कर्मचारी तसेच गोपालकृष्ण वाचनालयामध्ये ही मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.

मोठे वाघोदा येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा ....

त्यावेळी विद्यार्थांनी वाचनालयातील सर्व माहिती जाणुन घेतली.व त्यांना वाचणाचे महत्व व मराठी भाषेची महंती सांगण्यात आले. वाचनालयात किसन सुपे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले त्यावेळी पी आर पाटील सर जी आर महाजन सर विजयकुमार पाटील सिताराम महाजन डॉ. सिताराम पाटील गोपाल सुपे ग्रंथपाल जीवन कापसे लेखनिक संजय पाटील.पत्रकार कमलाकर माळी.योगेश पाटील व सर्व वाचक वर्ग उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button