Motha Waghoda

गणेशोत्सव कायद्याच्या चौकटीत राहून आनंदाने साजरा करा- डी वाय एस पी डॉ. कुणाल सोनवणे

गणेशोत्सव कायद्याच्या चौकटीत राहून आनंदाने साजरा करा- डी वाय एस पी डॉ. कुणाल सोनवणे

मोठा वाघोदा ग्रामपंचायत कार्यालयात शांतता समितीची बैठक संपन्न
प्रतिनिधी मोठा वाघोदा /मुबारक तडवी
सावदा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मोठा वाघोदा येथे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळ आणि शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन नुतन ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती सभेत फैजपूर तथा मुक्ताईनगर चे डिवाय एसपी डॉ.कुणाल सोनवणे यांचा सत्कार सरपंच मुबारक तडवी सपोनि डी डी इंगोले याचा सत्कार किशोर पाटील व कालु मिस्त्री तर उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांचा. सत्कार उपसरपंच लक्ष्मीकांत चौधरी कुलदीप पाटील आदींनी केला प्रतिष्ठीत शेतकरी डी.के महाजन किशोर जगन्नाथ पाटील माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य कालू मिस्तरी तंटामुक्ती समिती अध्यक्ष कुलदीप जगदीश पाटील आदींनी पोलिस अधिकारी यांचे स्वागत केले अध्यक्षीय भाषणातून डी वाय एस पी कुणाल सोनवणे यांनी गावातील गणेश मंडळाचे कार्यकर्ते यांना गणेश उत्सव मोठ्या आनंदाने व हर्षोल्लासात साजरा करा पण कायद्याच्या चौकटीत राहून साजरा करावा इतर धर्मीयांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी तसेच सामाजिक उपक्रम, विविध मदतपर, रक्तदान शिबीर प्रोत्साहनपर उपक्रम आयोजित करावीत जेणेकरुन आपल्या मंडळाची लोकप्रियता वाढेल जातिय सलोखा सारखे जनजागृती पर आरास साकारीत प्रबोधनात्मक प्रतिकृती साकारण्यावर भर द्यावा असे आवाहनही त्यांनी गणेश मंडळांना केले यावेळी पोलीस पाटील दिपक पाटील माजी सरपंच राजेंद्र सावळे उत्तम वाघ, पत्रकार शाकिर मलिक योगेश पाटील सुरेंद्र शिरनामे सवाज फतरु तडवी भिकारी न्यामत तडवी सुनिल पाटील राहुल महाजन आदी सह गणेश मंडळाचे अध्यक्ष कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button