Motha Waghoda

मोठे वाघोदा येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्याचा ७५वा अमृत महोत्सव साजरा

मोठे वाघोदा येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्याचा ७५वा अमृत महोत्सव साजरा

आर्मी सैनिकाचे हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन
ग्रामपंचायत तर्फे ४८ विद्यार्थी विद्यार्थिनी व खेळाडू प्रोत्साहनपर बक्षिसे वाटप
प्रतिनिधी /मोठे वाघोदा.ता.रावेर
रावेर तालूक्यातील मोठे वाघोदा येथे मोठ्या उत्साहात अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन दिन साजरा करण्यात आला यादिनी ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच मुबारक उर्फ राजू अलिखा तडवी यांनी ध्वजारोहण केले तर भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन सुरक्षा बल जवान सलिम इब्राहिम तडवी यांच्या हस्ते करण्यात आले तसेच उर्दू शाळा जिल्हा परिषद शाळा व प्रकाश विद्यालय येथे विविध मान्यवरांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी जिल्हा परिषद उर्दु शाळा व प्रकाश विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी देशभक्ती पर गीत गायन करीत गावातुन प्रभात फेरी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आली ग्रामपंचायत कार्यालयाचे प्रवेश द्वारावर नारंगी पांढरा हिरवा अशा
फुग्याच्या तीन रंगाचे फुग्यांनी तिरंगा ची आरास साकारीत तिरंगा सेल्फी पॉईंट ची ग्रामपंचायतीचे प्रवेश द्वारावर साकारण्यात आली होती. ग्रामपंचायत कार्यालयातर्फे एकूण ४८
जिल्हा परिषद मराठी मुलांची व मुलींची शाळा इयत्ता १ ली ते ४ जिल्हा परिषद उर्दु शाळा इयत्ता १ ली ते ७ वी तसेच प्रकाश विद्यालयातील इयत्ता १० वी आणि १२ तसेच अनुसूचित जाती जमाती. मागासवर्गीय विद्यार्थ्यांतून प्रथम द्वितीय येणारे विद्यार्थी तसेच गावातील क्रिडा खेळ यामध्ये विशेष केंद्र राज्य जिल्हा स्तरावरील विविध प्राविण्य मिळविलेल्या ३ खेळाडूंना ग्रामपंचायत तर्फे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.आर्मी BSF मध्ये असलेले सलीम तडवी यांच्यातर्फे भारतमातेच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले तसेच श्रीकृष्ण गोफ मंडल व ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थातर्फे त्यांचे स्वागत व शुभेच्छा देण्यात आल्या।सर्व महापुरुषांची वेशभूषा असलेले विद्यार्थी विद्यार्थिनी सर्वांचे लक्ष वेधत करत होते. तसेच एकता संघर्ष मंडळ तर्फे ढोल ताशांच्या गजरात तिरंगा रॅली काढण्यात आली होती. व श्रीकृष्ण गोफ मंडळातर्फे बस स्टँड परिसरात भारत मातेच्या प्रतिमेची फुगे फुलगुच्छांची सजावट करण्यात आली होती. व सर्व ग्रामस्थ राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी बहुसंख्येने ग्रामपंचायत कार्यालयावर उपस्थित होते.
➖➖

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button