Motha Waghoda

सातपुड्यातील आदिवासी मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करुन वाढदिवस साजरा

सातपुड्यातील आदिवासी मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करुन वाढदिवस साजरा

मोठा वाघोदा/मुबारक तडवी
मोठा वाघोदा च्या पवार कुटुंबांने सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी पाड्यात लहान मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करीत मुलाचा वाढदिवस साजरा केला
मोठा वाघोदा येथील येथील ग्रामपंचायत महिला सदस्या सौ.संगिता पवार पति स्वप्निल शांताराम पवार या दाम्पत्याचा उल्लेखनीय उपक्रम मोठा वाघोदा येथील शासकीय सेतू सुविधा केंद्र संचालक स्वप्निल पवार व सौ संगिता पवार या दाम्पत्याने आपल्या मुलाचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला
रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा येथील स्वप्निल पवार व
संगीता पवार यांनी आपल्या मुलाचा काल त्यांनी असे ठरवलं की हा वाढदिवस आपण एक आगळा वेगळ्या पद्धतीने साजरा करूया या निमीत्ताने त्यांनी सातपुड्याच्या कुशीत असलेले गारबर्डी या आदिवासी गावात जाऊन मुलांना शालेय साहित्य देऊन व मिठाई वाटून साजरा केला नुकत्याच आपल्या भारत देशाच्या राष्ट्रपतीपदी एक आदिवासी वनवासी महिला द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली पण मात्र आज आपण कितीही आधुनिकतेच्या बात्या मारत असलो आणि एकीकडे भारताला बुलेट ट्रेन,स्मार्ट शहरे,5G, उद्योगीक क्रांती घडवत असलो तरी आजही या देशात काही भागात वीज,रस्ते,शैक्षणिक,आरोग्य सुविधा नाहीत किती लोक उपेक्षित जीवन जगत आहेत आधुनिकतेच्या कितीही वल्गना केल्या तरी आज ही हे लोक मुख्य प्रवाहात नाही मग देश कसा महासत्ता होणार? आजही आपल्या देशातील आदिवासी,वनवासी समाज खूप दुर्लक्षित आहे बांधवांनो हाच वर्ग आज शैक्षणिक दृष्ट्या मुख्य प्रवाहात येणे खूप गरजेचे आहे आणी हा उद्देश्य मनात धरुन पवार कुटूंबियांनी आपल्या मुलाचा वाढदिवस आदिवासी पाड्यावर जाऊन साजरा केला त्यांना ही कळाव व जाणीव व्हावी आपण व त्या मुलांमधील अंतर किती आहे.म्हणुन त्यांना मुलगा वीर चा वाढदिवस पद्धतीने साजरा केला. आई भवानी वीर ला उदंड आयुष्य देवो हिच सदिच्छा
➖➖➖➖➖➖➖➖

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button