Amalner

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या महाराष्ट्रातील पोलीस पाटील यांच्या वारसांना आर्थिक मदत शासनाने करावी

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या महाराष्ट्रातील पोलीस पाटील यांच्या वारसांना आर्थिक मदत शासनाने करावी

अमळनेर

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या महाराष्ट्रातील पोलीस पाटील यांच्या वारसांना पन्नास लाख रुपयांची मदत शासनाने करावी व पाडळसे धरणाला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून द्यावा या विषयाचनिवेदन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे मा.खा. शरदचंद्रजी पवार व खा. सुप्रियाताई सुळे यांना देण्यात आले. अमळनेरतालुक्यातील कर्तव्यदक्ष पोलीस पाटील उल्हास नामदेव लांडगे, जव खेडे ता.अमळनेर जि.जळगाव यांचे कोरोनामुळे दुर्दैवी दुःखद निधन झाले. त्या समयी त्यांचे वय 47 वर्षे होते. जवखेडे चेक पोस्टवर रात्रंदिवस उल्हास लांडगे पोलिसांत समवेत सेवा देणारे उल्हास लांडगे जळगाव जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे सचिव होते. त्यांच्या मागे वृद्ध आई, पत्नी, दोन लहान मुले असा परिवार आहे. त्यांच्या वारसाला राज्य शासनाने पन्नास लाख रुपये आर्थिक मदत करावी असे निवेदनात म्हटले आहे.

पाडळसे धरणाला केंद्र व कर्जाच्या माध्यमातून पैसे मिळाले तरच धरण पूर्ण होईल. अशा परिस्थितीत मा खा. शरद पवार साहेब व खा सुप्रियाताई सुळे यांनी लक्ष घातल्याशिवाय प्रश्न मार्गी लागणार नाही. प्रा. अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली भेट देऊन चर्चा करण्यात आली वरील दोन्ही प्रश्नांसंबंधी उभयतांनी सकारात्मक भूमिका घेतली याप्रसंगी श्री बन्सीलाल भागवत, मोरे क्रांती संघटना कार्यकारीणी सदस्य महाराष्ट्र राज्य, वेदांशू पाटील, शुभम निकम उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button