Amalner

आणि गावात निघाली जिवंत माणसाची प्रेतयात्रा..!पाऊसच येईना..चिंता काही मिटेना..

आणि गावात निघाली जिवंत माणसाची प्रेतयात्रा..!पाऊसच येईना..चिंता काही मिटेना..

अमळनेर तालुक्यात पावसाचे अत्यल्प प्रमाण चिंता जनक आहे.आधीच कोरोना त्यात पाऊसच येईना..त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.पावसा अभावी ग्रामीण भागातील शेतकरी, हातमजूर, हतबल झाला आहे.तरुणांना गावातील परिस्थिती ची जाणीव होत असून आज वेगळ्याच माध्यमातून ही स्थिती मांडण्याचा
प्रयत्न मेहेरगाव येथील तरुणांनी केला आहे. मेहेरगाव येथील तरुणांनी व्यंग्यात्मक पद्धतीने , चित्रणातून प्रशासनाला, लोकप्रतिनिधीना दिलेली पूर्वसूचना किंवा
इशारा आहे.यात तरुणांनी श्री सुकलाल महादू कोळी वय ७० या जिवंत माणसाची अंत्ययात्रा, प्रेतयात्रा काढत जोरदार चपराक प्रशासन आणि लोक प्रतिनिधींना दिली
आहे. जी गोष्ट लहान लहान मुलांना,तरुणांना कळू शकते ती परिस्थिती हाता बाहेर गेल्यावर प्रशासनाला आणि लोक प्रतिनिधींना कळेल का? असाच प्रश्न जणू यातून
उपस्थित होत आहे.
येणाऱ्या काळात दुष्काळ सदृष्य, संकटाच्या परिस्थितीला, तालुक्यातील शेतकऱ्यांना सामोरे जावे।लागणार आहे. शेतकरी हा हवालदील होऊन आत्महत्या करण्यासारखे पाऊल उचलू शकतात असाच संदेश यातून दिला जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button