Amalner

जेष्ठ नागरिकाच्या खिशातील पैसे चोरून नेणारा चोर अटकेत..!अमळनेर पोलिसांनी अवघ्या 15 दिवसांत आरोपी शोधून घेतला ताब्यात…

जेष्ठ नागरिकाच्या खिशातील पैसे चोरून नेणारा चोर अटकेत..!अमळनेर पोलिसांनी अवघ्या 15 दिवसांत आरोपी शोधून घेतला ताब्यात…

अमळनेर येथील अशोक गोविंदा पाटील वय 65 वर्ष धंदा शेतमजुरी रा.पैलाड अमळनेर या शेतक-याने शेती कामासाठी दिनांक 16/07/2021 रोजी घरातील सोने तारण ठेवुन अर्बन बँक येथुन 55,000/- रुपये कर्ज घेतले होते.
सदरचे पैसे त्यांनी त्यांच्या पँटचे खिश्यात ठेवुन बँकेच्या मागे असलेली सार्वजनिक मुतारीत लघुशंकेसाठी गेले असता. दुपारी 12.45 वाजेच्या सुमारास एक इसम वय-32 शरिराने जाड याने त्यांना मागुन धरुन त्यांचे पॅन्टच्या खिश्यातील पैसे जबरदस्तीने काढुन घेतले. सदर बाबत अमळनेर पो.स्टे.प्रथम खबर क्रमांक 308/2021 भादंवि कलम 392 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याचा तपास पोहेकाँ /418 सुनिल कौतीक हटकर हे करीत होते. सदर गुन्ह्यातील आरोपी पळत असतांना तो अर्बन बँकेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होते.
त्यावरून अमळनेर पोलीसांकडून आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल करून फुटेज प्रमाणे नमुद वर्णनाच्या इसमाचा शोध घेणे सुरू होते. सदर गुन्ह्याचा तपास सुरू असतांना दिनांक 30/07/2021 रोजी मा. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या गोपनीय माहिती वरून सदर गुन्हयातील आरोपी इमरान पठाण रा.शिंदखेडा जि.धळे असे असल्याची माहिती मिळाली त्यावरुन अमळनेर पोलीस स्टेशनचे पोहेकाँ 418 सुनिल हाटकर ,पोना 2973 दिपक माळी,पोना 422 शरद पाटील व पोकाँ 3331 रविंद्र पाटील अश्यांना शिंदखेडा येथे जाणे बाबत
सुचना केल्या सदर पथकाने आरोपी याचा शोध घेवुन त्यास अमळनेर पोलीस स्टेशनला आणुन त्यास त्याचे नाव गांव विचारता त्याने त्याचे नाव इमरान समशेर पठाण वय 30 रा.तेरा घर मोहल्ला,नगरपंचायत समोर शिंदखेडा
जि.धुळे असे सांगितले त्यास विश्वासाधात घेवुन विचारपुस केली असता. त्याने सदर गुन्ह्याची कबुली देवुन सदरचे पैसे मीच जबरदस्तीने चोरुन नेले बाबत कबुली दिली. करीता सदर आरोपी यास गुन्हयाकामी अटक करण्यात आली असुन त्यास आज दिनांक 31/07/2021 रोजी मा.न्यायालय समोर हजर केले असता त्यास मा.न्यायालय यांनी दिनांक 03/08/2021 पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मजुर केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button