Amalner

अवैध वाळू वाहतुक विरोधात आदीवासी ग्राम समिती मार्फत प्रांताधिकारी व तहसीलदार यांना निवेदन

अवैध वाळू वाहतुक विरोधात आदीवासी ग्राम समिती मार्फत प्रांताधिकारी व तहसीलदार यांना निवेदन

अमळनेर – काही महिन्यांपासून अमळनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात बोरी नदी पत्रातून अवैध वाळू वाहतूक होत आहे. या विरोधात अमळनेर तालुका आदिवासी ग्राम समिती मार्फत प्रांताधिकारी यांना त्यांच्या प्रतिनिधी चौधरी यांच्या मार्फत तसेच तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना निवेदन देण्यात आले आहे.
वाळूमाफिया हे अवैध रित्या वाळू वाहतूक करीत आहेत. मात्र याच्या संबंधित ठिकाणच्या नागरिकांना त्रास होतो याचा देखील विचार करीत नाहीत. तसेच जबरदस्ती व गुंड गर्दि करून वाळू चोरी करीत आहेत. ती तात्काळ बंद करावी अशी मागणी या वेळी झाली. तसेच यावेळी रोजगाराची देखील मागणी करण्यात आली आहे.
यावर तहसीलदार वाघ यावर म्हणाले की , यावर लवकरात लवकर कार्यवाही होईल.
वाळू माफियांवर लवकरात लवकर कार्यवाही व्हावी अशी मागणी संपुर्ण तालुक्यात जोर धरू लागली आहे. यावेळी आदिवासी ग्राम समितीचे अध्यक्ष आनंद पवार यांच्या सह मंगल भिल, नंदू भिल, मनोज भिल, पिंटू भिल, गोपाल भिल, अर्जुन भिल, विकास भिल, दीपक भिल, अरुण भिल, गणेश भिल, महादू भिल, प्रकाश भिल, लक्ष्मण भिल, करण भिल, श्रावण भिल, बाबू भिल, सोमनाथ भिल, विकास भिल, रमेश भिल, सुरेश भिल, राजु भिल, वामन भिल, भूषण भिल,नामदेव भिल, सागर भिल, शिवदास भिल, मुकेश भिल, प्रकाश भिल यांसह परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button