आटपाडी

उन्नती महीला विकास फौंडेशन तर्फे बाल दिन तसेच पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती

उन्नती महीला विकास फौंडेशन तर्फे बाल दिन तसेच पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती

राहुल खरात

आटपाडी- उन्नती महीला विकास फौंडेशन तर्फे बाल दिन तसेच पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती जिल्हा परिषद शाळा धांडोरमळा येथे जाऊन चिमुकल्याबरोबर साजरी केली .फौंडेशन च्या अध्यक्षा अनिता पाटील व मुलांनी मिळून केक कापला . फौंडेशन तर्फे मुलांना केक व खाऊ वाटप करण्यात आले . मुले फार आनंदी होती ,केक हा त्यांचा आवडता पदार्थ असल्याने मुलांनी खाऊचा आनंद लुटला .

अनिता पाटील यांनी मुलांना मार्गदशन करताना सांगितले की चाचा नेहरू हे तीन वेळा भारताचे प्रधानमंत्री होते .कित्येक वेळा भारत स्वतंत्र च्या लढाई मध्ये ते जेल मध्ये गेले. चाचा नेहरू यांना लहान मुलांचा फार लळा होता. मुले त्यांना चाचा नेहरू या नावाने हाक मारत असत. म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त बाल दिन साजरा केला जातो .तसेच मुलांनी मोबाईल पासून दूर राहून मैदानी खेळांकडे लक्ष द्यावे असे आवर्जून सांगितले
यावेळी जिल्हा परिषद धांडोरमळा शाळेच्या शिक्षिका बडे मॅडम ,सपाटे मॅडम व हिराबाई भोसले उपस्थित होत्या

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button