आटपाडी

शेतीचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडणारे महाराष्ट्र , देशाला दिशा देणारे पहिले राज्य ठरावे . सादिक खाटीक यांची मागणी

शेतीचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडणारे महाराष्ट्र , देशाला दिशा देणारे पहिले राज्य ठरावे .
सादिक खाटीक यांची मागणी

राहुल खरात
आटपाडी दि .२९ ( प्रतिनिधी )
देशाला दिशादर्शक ठरेल असे महाराष्ट्राच्या विधीमंडळात शेती , शेतकऱ्यांसाठीचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडण्याचे नवे धोरण राज्य सरकारने स्विकारावे अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक यांनी केली आहे .
मुख्यमंत्री ना . उध्दव ठाकरे यांच्या सरकारने दोन लाख रूपया पर्यतचे कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल सरकारचे अभिनंदन , कौतूक करून सादिक खाटीक यांनी दोन लाखापेक्षा जास्त कर्ज असणारांनाही या दोन लाखाच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहीजे अशी मागणी करून सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र शेती अर्थसंकल्पाची महत्वपूर्ण मागणी केली.

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार साहेब , मुख्यमंत्री ना . उध्दव ठाकरे साहेब . राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा कॅबिनेट मंत्री ना . जयंतराव पाटील साहेब , कॉंग्रेसआयचे प्रदेशाध्यक्ष तथा कॅबिनेट मंत्री ना . बाळासाहेब थोरात , माजी उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार साहेब , खासदार सौ .सुप्रियाताई सुळे या मान्यवरांचे या मागणीकडे लक्ष वेधले आहे , असे ही सादिक खाटीक यांनी स्पष्ट केले
राजा , मालक असणाऱ्या शेतकऱ्याची पोतराजा सारखी दयनीय स्थिती झाल्याचे स्पष्ट करताना सादिक खाटीक म्हणाले ,गत तीन वर्षाच्या दुष्काळाने पुरते होरपळून निघालेले महाराष्ट्रातील हजारो गावातील लाखो शेतकरी या वर्षीच्या परतीच्या आणि नंतरच्या अवकाळी पावसाने पुरते मोडुन निघाले आहेत .शेतकरी , शेतमजूर , कष्टकरी यांच्यासह त्यांच्या पदरी असणाऱ्या पशुधनाचे मोठे हाल सुरू आहेत ,
सप्टेंबर पर्यत राज्यात शेकडो ठिकाणच्या छावण्यामध्ये हजारो जनावरे सहा – सात महिन्यापासून डांबून होती आणि महिन्याभराच्या पावसाच्या वारेमाप दणक्याने पूर्ण शेती उदयोग उध्वस्त झाला आहे .जनावरांच्या चाऱ्याच्या प्रश्नाबरोबर शेतातील उभे पीक , फळबागा यांचे अतोनात झालेल्या नुकसानीने शेतकरी वर्गात पुढे कसे होणार या भीतीने ग्रासले आहे. कृषी प्रधान देश म्हणून ओळख असणाऱ्या आपल्या देशातील अनेक राज्यात आणि विशेषतः महाराष्ट्रात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत , हे अनेक वर्षाचे विदारक चित्र आहे .
राज्यातल्या खरीपाच्या नुकसानी बद्दल हेक्टरी वीस हजार रुपये आणि हानी ग्रस्त फळबागांसाठी तातडीने हेक्टरी चाळीस हजार रुपये मदत , अनुदान दयावे. अशी लाखो अवकाळी ग्रस्तांची प्राथमिक अपेक्षा होती आणि आहे.
सादिक खाटीक पुढे म्हणाले ,केंद्र आणि राज्यस्तरावरील संकटग्रस्तांसाठी मदतीचे जाचक निकष , नियम , अत्यल्प तरतुदीची कपाळ करंटी व्यवस्था बदलून कोणत्याही संकटात सापडणाऱ्या संकटग्रस्तांना त्याच्या दु :खावर योग्य अर्थसहाय्यातून सहानुभूतीचा किमान मलम लावला जाईल असे नवे धोरण तातडीने आणणे गरजेचे आहे . जंगली हिंस्त्र प्राण्यांनी शेळ्या , मेंढया , गाई , म्हैशी मारल्यानंतर नुकसान भरपाई दिली जाते , त्याच्या निम्म्याने तरी दुष्काळ , अतिवृष्टी अवकाळीच्या तडाख्यात सापडल्यानंतर या लहान मोठया जनावरांच्यासाठी शासनाने मदतीचे धोरण स्विकारले पाहीजे . शासनाने प्रति मोठे जनावर तीन हजार आणि प्रति लहान जनावर एक हजार रुपये तातडीने अनुदान द्यावे .नुकसान भरपाईचे विम्याचे पैसे हानी ग्रस्त शेतकऱ्यांना देण्यासाठी शासनाने युध्दपातळीवर यंत्रणा राबवावी , आणि विम्याच्या पैशासाठी ना नु करणाऱ्या , चुकीच्या माहीत्यांद्वारे पळवाटा काढून नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करणाऱ्या विमा कंपन्यांवर कडक कारवाईची भूमिका शासनाने घ्यावी .
शेतकऱ्यांच्या डोक्यावर असणारे कर्ज सरसकट शंभर टक्के माफ करणे शक्य नसल्यास किमान पाच लाखापर्यतची थकीत कर्जे माफ करावीत , वीज , पाणी , बी- बीयाणे मोफत देवून शेतकऱ्यांना शुन्य व्याजदराने दीर्घ मुदतीचे पाच लाखापर्यतचे कर्ज तातडीने देण्याचे धोरण स्विकारावे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दुप्पट उत्पन्न मिळेल असे नवे धोरण अंमलात आणावे.
देशाला दिशादर्शक ठरेल असे महाराष्ट्राच्या विधिमंडळात शेतकऱ्यांसाठीचे स्वतंत्र अर्थसंकल्प मांडण्याचे नवे धोरण स्विकारले जावे .या अर्थसंकल्पासाठी राज्याच्या एकूण अर्थसंकल्पापैकी मोठी रक्कम शेतीच्या अर्थसंकल्पासाठी निर्धारीत केली जावी .

काही वर्षापूर्वी देशाचे तत्कालीन अर्थमंत्री पी . चिदंबरम यांनी संसदेत दिलेल्या लेखी उत्तरात , देशातल्या सर्व धर्मीयांच्या धार्मिक स्थळातुन प्रतिवर्षी जमणारा पैसा देशाच्या बजेटच्या अठरा पट जास्त असल्याचे प्रसिद्ध विचारवंत श्री . हरी नरके यांच्या वृत्तपत्रातील लेखातून वाचनात आले होते .आणि हे जर खरे असेल तर देशातल्या सर्वच धर्मीयांच्या धार्मिक स्थळामध्ये जमणारा पैसा , हे सर्वच धर्मातल्या सामान्य देवभोळ्या शेती उदयोगाशी निगडीत असणाऱ्या नव्वद टक्के जनतेच्या कष्टाचा , घामाचा पैसा आहे , आणि तो अमर्याद पैसा शेतकरी कष्टकरी देशवासीयांच्या विकासासाठी , संवर्धणासाठी सत्कारणी लागल्यास ते देशहिताचे ठरेलच शिवाय प्रत्येक धर्मातल्या परमेश्वरांनाही ते खुप आवडेल . सर्वच धर्माच्या धार्मिक स्थळांमध्ये जमणाऱ्या एकूण पैशापैकी नव्वद टक्के रक्कम देशासाठी वापरली गेल्यास आपला देश सर्वात प्रगतीपथावर वाटचाल करणारा जगात अव्वल देश ठरू शकेल . यातून देशाचे सरकार आणि राज्यांच्या सरकारांना मोठे आर्थीक स्थैर्य मिळू शकेल .
संस्थाने खालसा करताना , बँकाचे राष्ट्रीयकरण करताना किंवा अनेक मोठ मोठया निर्णयात देशातल्या त्या त्यावेळच्या नेतृत्वाने देशहीत , राष्ट्रहितालाच प्राधान्य दिल्याचा आपला इतिहास आहे . याचे अवलोकन करता सर्वच धर्मीयांच्या धार्मिक स्थळातील पैसा सरकारकडे घेण्याचा निर्णय करणारे देशातील पहिले क्रांतीकारी राज्य महाराष्ट्र ठरेल या अनुषंगाने राज्य सरकारने निर्णय करावा . शेतीचा अर्थसंकल्प मांडणारे महाराष्ट्र हे राज्य देशात .पहिले ठरावे आणि शेती,शेती व्यवसाय सर्वार्थाने यशस्वी होवून भारत देश खऱ्या अर्थाने कृषी प्रधान देश आहे आणि इथला शेतकरी , कष्टकरी खरोखरच राजा आहे . हे चित्र वास्तवात येण्यासाठी राज्य सरकारने नवीन वर्षात अनेक क्रांतीकारी निर्णय करीत देशात झंझावात निर्माण करावा अशी अपेक्षा ही सादिक खाटीक यांनी शेवटी व्यक्त केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button