आटपाडी

डॉ .बाबासाहेब आंबेडकर भारताचे पंतप्रधान झाले असते तर भारत सारे जहॉंत शक्तीशाली देश म्हणून पुढे आला असता . — सादिक खाटीक

डॉ .बाबासाहेब आंबेडकर भारताचे पंतप्रधान झाले असते तर
भारत सारे जहॉंत शक्तीशाली देश म्हणून पुढे आला असता .
— सादिक खाटीक

राहुल खरात

आटपाडी दि.२२ ( प्रतिनिधी )
नियती व देशाने डॉ . बाबासाहेब आंबेडकरांना पहिली वीस वर्षे भारताचे पंतप्रधान होवू दिले असते तर भारत सारे जहाँत अव्वल सर्वशक्तीशाली देश म्हणून पुढे आला असता असे उदगार राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक यांनी काढले .
फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान सप्ताह च्या निमित्ताने आयोजित व्याख्यानाच्या अध्यक्षीय स्थानावरून ते बोलत होते.
गोमेवाडी गावचे सुपुत्र , जतचे दिवंगत माजी आमदार जयंत सोहनी यांचे स्मरण करून सादिक खाटीक यांनी संयोजक राजेंद्र खरात आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रतिकुल आर्थिक परिस्थिती असताना ही गेली पाच वर्षे संविधान सप्ताहाचा सुरु ठेवलेला हा उपक्रम भविष्यात राज्य आणि देशात इतिहास निर्माण करणारा ठरणार आहे . या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी सर्वांनी मदतीचा हात दिला पाहीजे असे स्पष्ट केले .
सादिक खाटीक पुढे म्हणाले , डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौफेर कार्याचे आणि संविधानाचे , गावोगावी पारायण झाले पाहीजे . बहुजनाना डॉ .आंबेडकर आणि संविधान समजल्यास संविधानाविरूध्द कोणाची ब्र ही काढण्याची हिम्मत होणार नाही . आंबेडकर आणि संविधान अभ्यासक समाज मोठया ताकदीने उभारण्यासाठी शालेय शिक्षणापासून पदवी पर्यतच्या अभ्यासक्रमात संविधान आणि आंबेडकरांच्या विचारप्रणालीचा समावेश व्हावा म्हणून शासन पातळीवर आपण आवाज उठविणार आहोत.

महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान या विषयावर बोलताना श्रीगोंदयाच्या प्रसिध्द व्याख्याता सौ . सुनंदाताई भोस म्हणाल्या , मस्तक कुणाचे हस्तक बनू न देणारे जगमान्य संविधान निर्माण करणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड हाल अपेष्टा सहन करीत परिस्थितीचे भांडवल न करता बहुजन समाजाच्या उद्धाराकरिता आयूष्यभर प्रचंड काम केले . कडाक्याच्या थंडीपासून बचाव करणाऱ्या जीवनमरणाच्या प्रसंगीही दारू ला स्पर्श न करणाऱ्या बाबासाहेबांच्याच जयंती पुण्यतिथीच्या मिरवणूकांमध्ये दारू पिवून नाचणाऱ्यांना बघितल्यावर दुःख होते . चीड येते , ज्यावेळी नाचणारी सर्वच पोरं, वाचणारी पोरं बनतील त्यावेळी ती क्रांती करणारी, जगाला नाचविणारी पोरं म्हणून पुढे येतील .
राजे महाराजे , संस्थानिक , शिक्षित लोक आणि कर भरणाऱ्यांना मताधिकार देण्याचा विचार चालविलेल्या तत्कालीन राज्यकर्त्यांच्या भूमिकेला कडाडून विरोध करून प्रत्येक प्रौढ व्यक्तीला मताधिकाराचे ब्रम्हास्त्र आंबेडकरांनी मिळवून दिले .परंतू पाचशे हजाराला मते विकून अधोगती आणणाऱ्यांनी आपल्या चौफेर प्रगती साठी जागरूकतेने मतदान करणे गरजेचे असल्याचे सुनंदाताई भोस यांनी स्पष्ट केले .
शिक्षकांना ज्ञानदाना व्यतिरिक्त अन्य कामे लावणाऱ्या आजच्या व्यवस्थेने शिक्षणाचा बोजवारा उडवित ,बहुजन समाजाला शिक्षणापासून बाजूला करण्याचा ,चांगले शिक्षण , चांगले संस्कार मिळू न देण्याचे प्रकार चालवल्याचा आरोप करून सुनंदाताई बोस यांनी , छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यप्रणालीला समोर ठेवून आंबेडकरांनी आपले प्रचंड कार्य साकारले .छत्रपती शिवाजी महाराज आणि आंबेडकर यांचे हे आत्मीयतेचे वैचारीक नाते लक्षात ठेवून शिवशक्ती , भिमशक्तीने एक संघपणे देश समृध्द करण्याचे काम केले पाहिजे असे स्पष्ट केले .
प्रारंभी स्वागत व प्रास्तावीक मंचाचे अध्यक्ष राजेंद्र खरात यांनी केले . सामाजीक कार्यात मोलाचे योगदान देणाऱ्या प्राथमिक शिक्षिका सौ .राजश्री मोटे यांचा संविधानाची प्रत भेट देवून गौरव करण्यात आला. यावेळी लक्ष्मण मोटे , रणजीत ऐवळे , धीरज प्रक्षाळे , सुरेश मोटे सर , प्रा .बालाजी वाघमोडे ,एस .एन. पाटील सर ,प्रा .संताजी देशमुख , अरविंद चांडवले , दीपक खरात , महेश काटे , सौ . सुश्मिता मोटे , सौ . अनिशा रविकिरण जावीर , सौ . कविता खरात , सौ . माया वाघमोडे , पुनम ऐवळे , प्रमिला प्रक्षाळे , वैशाली मोटे , छाया मोटे , सुजाता मोटे , अनिता मोटे , रोहीणी कदम , वैशाली कदम ,लक्ष्मी कदम इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षकांचे नेते शाम ऐवळे सर यांनी केले तर आभार बिपीन देशपांडे यांनी मानले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button