आटपाडी

आटपाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्षपदी नंदकुमार निचळ , उपाध्यक्षपदी लक्ष्मण सरगर यांची निवड!

आटपाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्षपदी नंदकुमार निचळ , उपाध्यक्षपदी लक्ष्मण सरगर यांची निवड!

राहुल खरात
आटपाडी दि २८ ( प्रतिनिधी )
आटपाडी तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्षपदी दै.पुण्यनगरीचे नंदकुमार निचळ ( खरसुंडी ) यांची व उपाध्यक्षपदी लोकमतचे लक्ष्मण सरगर (करगणी ) यांची निवड करण्यात आली. पत्रकार संघाचे वार्षिक बैठकीमध्ये ही निवड बिनविरोध करण्यात आली.यावेळी सचिव म्हणून धीरज प्रक्षाळे,खजिनदार लतीफ मुलाणी,संपर्क प्रमुख सदानंद कांबळे यांची निवड करण्यात आली. बैठकीस मावळते अध्यक्ष पत्रकार नागेश गायकवाड ,सतिश भिंगे, प्रशांत भंडारे, किशोर पुजारी, अच्युत गिड्डे, अशोक पवार,तानाजी गायकवाड, मनोज कांबळे, सदानंद कांबळे, दिपक प्रक्षाळे, सुशांत कासार,बिपीन देशपांडे, सदाशिव पुकळे, गणेश जाधव,प्रशांत देशमुख आदी उपस्थित होते. निवडीनंतर नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.!
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न आटपाडी तालुका मराठी पत्रकार संघ असून परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज काटकर यांनी नुतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे . !

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button