Amalner

?️ ठोस प्रहार ब्रेकिंग..खड्डा ठरतोय अपघाताचे कारण.. चला खड्ड्यात पडा…नगरपरिषदेचा खड्डा प्रपंच….

?️ ठोस प्रहार ब्रेकिंग..खड्डा ठरतोय अपघाताचे कारण.. चला खड्ड्यात पडा…

प्रा जयश्री दाभाडे

अमळनेर शहर अनेक कारणांसाठी ओळखले जाते. त्यात नवीन भर पडली असून अमळनेर शहर खड्ड्यांचे शहर म्हणून नवी ओळख निर्माण झाली आहे. कारण अमळनेर नगरपरिषदेतर्फे खड्डे तर केले जातात पण ते बंद करण्याची पद्धत किंवा गरज असते हा नियम अमळनेर नगरपरिषदेला माहीत नसावा असे वाटते. ठिक ठिकाणी विविध कामांसाठी खड्डे खोदून ठेवले आहेत. काही ठिकाणी काम सुरू आहे तर काही ठिकाणी काम संपूनही खड्डे जैसे थे असल्याचे निदर्शनास आले आहे. याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे प्रताप मिलकडून गलवाडे कडे जाणाऱ्या रस्त्याच्या बरोबर वळणावर एक खड्डा पाणी पुरवठा विभागाने करून ठेवला आहे. येथे पाण्याचे व्हॉल्व असून कोणत्याही प्रकारची कार्य सुरू आहे किंवा संपले आहे असा फलक तर नाहीच पण या मोठ्या खड्ड्याच्या आजूबाजूला कोणत्याही प्रकारची सुरक्षा केलेली नाही. विशेष म्हणजे येथे स्ट्रीट लाईट नाही त्यामुळे येथे खड्डा आहे हे रात्रीच्या वेळी अजिबात लक्षात येत नाही. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. परिसरातील नागरिकांनी या संदर्भात तक्रार केली असून वळणावर दिवसा देखील अचानक वळताना हा खड्डा दिसत नसल्याचे सांगण्यात आले आहे. तरी त्वरित नगरपरिषदेने ह्या खड्ड्याला योग्य ते सुरक्षा कवच घालावे आणि अपघात टाळावेत अशी मागणी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button