आटपाडी

राष्ट्रीय सेवा योजना जगून बघा राष्ट्र घडविल्याचे समाधान मिळेल—दिव्या मतकर

राष्ट्रीय सेवा योजना जगून बघा राष्ट्र घडविल्याचे समाधान मिळेल—दिव्या मतकर

राहुल खरात

आटपाडी। प्रतिनिधी / बनपुरी दि.25 डिसेंबर,
कला आणि विज्ञान महाविद्यालय,आटपाडीचे विशेष श्रम संस्कार शिबीर बनपुरी गावामध्ये सुरु आहे.राष्र्टीय सेवा योजनेची महाराष्र्ट राज्यातील उत्कृष्ट स्वंसेविका दिव्या मतकर आज विद्यार्थ्यांना मार्गदर्शिका म्हणून उपस्थित होती.
राष्ट्रीय सेवा योजनेत गुण मिळवायचे म्हणून प्रवेश घेऊ नका तर ही योजना काय आहे ते समजून घेऊन त्याप्रमाणे जगा.सैनिक जसा राष्ट्राची सेवा करतो तशीच एन.एस.एसचा पोरगा सुद्धा देशसेवा करतो. लोकांच्या मनात जाणीव जागृती निर्माण करून संवेदशील समाज घडवतो.या संधीचा फायदा घेऊन तरूणांनी पुढे यावं आणि सक्षम देश घडवावा आसं प्रतिपादन दिव्या मतकरने केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैशाली कांबळे होत्या. सूत्रसंचालन बाळुताई लवटे हिने केले प्रास्ताविक प्रियांका जाधव हिने केले तर आभार भरत कोळेकर याने मानले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button