Kolhapur

प्राथमिक शिक्षक बँक निवडणुकित सभासद हितासाठी सर्व संघटना व शिक्षक नेत्यांनी एकत्र यावे- अमोल शिंदे

प्राथमिक शिक्षक बँक निवडणुकित सभासद हितासाठी सर्व संघटना व शिक्षक नेत्यांनी एकत्र यावे- अमोल शिंदे

सुभाष भोसले
प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची निवडणूक जसजशी जवळ येईल तसे जिल्ह्यातील शिक्षक राजकारण ढवळून निघत आहे.महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन नेहमीच DCPS धारक बंधू-भगिनी यांचे प्रश्न तसेच शिक्षकांच्या धोरणात्मक बाबी बद्दल गेली चार वर्षे आपल्या सर्वांच्या सहकार्याने कार्यरत आहे. मी स्वतः शिक्षक बँक निवडणूक लढणार नाही हे जिल्ह्यातील पहिल्या आंदोलनाच्या वेळी जाहीर केले आहे. पण याचा अर्थ महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन कोणतीच भूमिका घेणार नाही असे नाही, त्याचबरोबर
शिक्षक बँक ही संस्था शिक्षकांच्या प्रगतीत एक महत्त्वाची व्यवस्था आहे. त्या माध्यमातून अनेक शिक्षक बंधू-भगिनी आर्थिक उलाढाल करत असतात.ही बँक सर्वस्वी सर्व सभासद अर्थात शिक्षकांची आहे.ती शिक्षकांच्या हितासाठी कार्यरत असावी ही धारणा प्रत्येक शिक्षकांची आहे.
निवडणुका जवळ येताच ओघाने शिक्षक संघटना मधील राजकारण सक्रीय होते.एकमेकावर आरोप प्रत्यारोप होतात.इतर वेळी शिक्षकांच्या प्रश्नाबाबत जितक्या संघटना आक्रमक वाटत नाहीत तितक्या ह्या काळात होतात.मतभेद व राजकारण यात शिक्षक वर्ग कारण नसताना भरडला जातो.मतभेद बाजूला सारून शिक्षकांच्या हिताच्या दृष्टीने सर्व संघटनांनी एकत्र येत संघटना विरहित शिक्षक बँकेत चांगल्या अभ्यासू व सभासद हिताचा कारभार करू शकतील आशा सदस्यांना बिनविरोध संचालक बनवावे व एक आदर्श व्यवस्था निर्माण करण्यात जिल्ह्यातील सर्व संघटनांच्या जाणत्या नेत्यांनी पुढाकार घेवून आदर्श निर्माण करावा अशी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनची भूमिका आहे.
ही बाब कठीण असली तरी अशक्य नाही.तसेच यामध्ये अडचणी असतील तर संघटना विरहित निवडणूक पॅनल करण्यात यावे.यामध्ये सर्व संघटना मधील बँक ही सभासद हितासाठी चालवली पाहिजे व त्यासाठी संघर्ष करण्याची व आपली निष्ठा ही सामान्य सभासदासोबत असेल आशा व्यक्तींनी पुढाकार घ्यावा.परंतु यामध्ये यापूर्वी शिक्षक बँकेत संचालक असणाऱ्या व बँकेत ज्यांचे नातेवाईक नोकरीला आहेत आशा व्यक्तींना उमेदवारी देण्यात येवू नये.जेणेकरून जुन्या परंपरा पुढे चालणार नाहीत असा विश्वास सभासदांना मिळेल.
वरील बाबी कोणा एका व्यक्ती किंवा एका संघटनेच्या हातात नाहीत.यासाठी सर्वच संघटना व जिल्ह्यातील ज्येष्ठ नेतृत्व करणाऱ्या मंडळीनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.यासाठी नक्कीच आमच्याकडून प्रयत्न केले जातील.
परंतु सभासद हित म्हणत केवळ व्यक्तिगत महत्वाकांक्षा पुढे रेटल्या जाणार असतील तर आशा वेळी निवडणुकीत सहभाग न घेणे ते अन्य कोणताही पर्याय आमच्यासाठी खुला आहे.पण यातील कोणताही निर्णय सर्वांशी चर्चा करून एकमताने घेतला जाईल.इतर संघटनांनी सकारात्मक भूमिका न घेतल्यास लवकरच नेमकी काय भूमिका घ्यावी पुढील दिशा काय असावी याबाबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन कडून एक बैठक घेवून सर्वसमावेशक धोरण ठरवले जाईल.
बरेच दिवस आपल्याशी याबाबत संवाद करण्याची इच्छा होती.या निवेदन द्वारे मी माझी भूमिका केवळ आपण जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन वर प्रेम करणाऱ्या व या संघटनेच्या वाटचालीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रत्येक DCPS धारक,ज्येष्ठ शिक्षक बंधू भगिनी व बँकेचे सुज्ञ सभासद यांच्यासाठी स्पष्ट केली आहे.
असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य जुनी हक्क पेन्शन संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष अमोल
शिंदे यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button