Kolhapur

राहूल दत्ताजीराव पवार यांचा मुख्याध्यापकपदी निवड झाले जिल्हाध्यक्ष काकासाहेब भोकरे यांचे मार्फत सत्कार संपन्न

राहूल दत्ताजीराव पवार यांचा मुख्याध्यापकपदी निवड झाले जिल्हाध्यक्ष काकासाहेब भोकरे यांचे मार्फत सत्कार संपन्न

सुभाष भोसले कोल्हापूर

कोल्हापूर : राहूल दत्ताजीराव पवार,मुख्याध्यापक पडळ हायस्कूल,पडळ ता. पन्हाळा यांची मुख्याध्यापक पदी निवड झाले बद्दल त्यांचा सत्कार शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष काकासाहेब भोकरे यांचे हस्ते करणेत आला . यावेळी कोजिमाशि चेअरमन बाळ डेळेकर , शिक्षक नेते व तज्ञ संचालक दादासाहेब लाड संचालक अनिल चव्हाण, कादर जमादार, सुधाकर डोणोलीकर, अशोक मानकर , शशिकांत माने, मदन निकम यांच्या उपस्थितीत करणेत आला
राहूल पवार यांची २००१ ते २००५ पर्यत संस्थेने शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणून नियुक्ती केली त्यांनी बी पी एड केले नंतर त्यांची नियुक्ती संस्थेने २००३ ला सहाय्यक शिक्षकपदी केली. त्यांनाहँडबॉल,टेनीकॉइट,कबड्डी,गोळाफेक, लॉंग रानिंग ,रस्सीखेच, खो-खो या खेळाची आवड आहे .या खेळामध्ये 50 हुन अधिक खेळाडू राज्य पातळीवर त्यांनी मार्गदर्शन करून यशस्वी केले आहेत . त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेवून १ ऑगष्ट २०२१ ला संस्थेने मुख्याध्यापकपदी नियुक्ती केली .
त्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे पदाधिकारी, पालक, आजी माजी विदयार्थी सर्व ग्रामस्थ यांचेकडून अभिनंदन होत आहे

संबंधित लेख

Back to top button