Kolhapur

सरवडे येथील कोळी आदिवासी बांधवाचा जागतिक आदिवासी क्रांती दिनानिमित्त नवोपक्रम

सरवडे येथील कोळी आदिवासी बांधवाचा जागतिक आदिवासी क्रांती दिनानिमित्त नवोपक्रम

सुभाष भोसले कोल्हापूर

कोल्हापूर : राधानगरी भुदरगड तालुक्यातील कोळी आदिवासी समाजातील बांधवांनी सरवडे येथे जागतिक आदिवासी क्रांती दिन विविध उपक्रमांनी साजरा केला. आपल्या हक्कासाठी एकसंघ राहून संघटीत पणे लढा द्यावा त्यांना शासकीय योजनाची कामे आणि जातीचे दाखले काढण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्याची ग्वाही आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली. ते सरवडे येथे घेण्यात आलेल्या जागतिक आदिवासी क्रांती दिनाच्या मेळाव्यात बोलत होते.
राधानगरी भुदरगड तालुक्यातील कोळी आदिवासी समाजातील बांधवांनी जागतिक आदिवासी क्रांती दिन सरवडे येथे विविध उपक्रमांनी साजरा केला. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिल्यांदाच हा समाज एकत्र आला होता यावेळी आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले शासनाच्या अनेक योजनेपासून कोळी आदिवासी समाजातील बांधव वंचित आहेत याचबरोबर शिक्षण कामी त्यांना जातीचे दाखले काढण्यासाठी अनेक अडचणी येतात यामुळे शिक्षणाबरोबर शासकीय सेवेतही त्यांना अडचणी येतात हे दूर करण्यासाठी समाजाने संघटीत पणे लढावे त्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी लागेल ती मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी आदिवासी जमातीतील कसबा वाळवे, सरवडे, तुरंबे, घोटवडे, शेणगाव, कुर, वाघापूर, मडिलगे या गावातील ५० पात्र लाभार्थ्यांना कोते येथील शासकीय आश्रम शाळेच्या वतीने खावटी अनुदान , दोन हजार रुपये रोख आणि दोन हजार रुपये किमतीचे अन्नधान्याचे कीट मान्यवरांच्या हस्ते वाटप केले. यावेळी वेदगंगा नदीच्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी गेलेला युवक केदार कांबळे हा पुराच्या पाण्यात अडकला होता त्याला स्वताचा जीव धोक्यात घालून वाचवणारे योगेश कोळी याचाही गौरव यावेळी केला. कार्यक्रमास तहसीलदार मीना निंबाळकर, जि.प. च्या बांधकाम सभापती वंदना जाधव, माजी उपसभापती अरुण जाधव, कोळी समाजाचे मार्गदर्शक डॉ. मनोहर कोळी, सरपंच मनोज्ञा मोरे, मंडळ अधिकारी शिवाजी कोळी यांच्यासह राधानगरी भुदरगड तालुक्यातील आदिवासी कोळी बांधव उपस्थित होते.
सरवडे येथे जागतिक आदिवासी क्रांती दिनात बोलताना आमदार प्रकाश आबिटकर, तहसीलदार मीना निंबाळकर, बांधकाम सभापती वंदना जाधव आदि ९ तुरंबे १

संबंधित लेख

Back to top button