Kolhapur

लॉयन्स क्लब, उदगीर सनराइजर्स , उदगीर यांच्या मदतीने कोल्हापूरवासीय गेले भारावून. सूळकूड, कोनवडे, मूरगुड, बसरेवाडी, मडिलगे बु॥, कुरणी येथील पूरग्रस्ताना दिला मदतीचा हात.कोल्हापूर जिल्हयातील महापूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप..

लॉयन्स क्लब, उदगीर सनराइजर्स , उदगीर यांच्या मदतीने कोल्हापूरवासीय गेले भारावून. सूळकूड, कोनवडे, मूरगुड, बसरेवाडी, मडिलगे बु॥, कुरणी येथील पूरग्रस्ताना दिला मदतीचा हात.कोल्हापूर जिल्हयातील
महापूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप..

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील महापूरामुळे नुकसानग्रस्त येथील कुंटुबाना लॉयन्स क्लब, सनराईझर्स उदगीर या संस्थेकडून मदतीचा हात देणेत आला .
अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश गावातील अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाले. लोकांचे संसार उघड्यावर आले. येथील बाधित झालेल्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट देऊन या संस्थेने मदत करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. या लोकांना चादरी, बिस्कीट, कपडे, साबण, टूथपेस्ट, सॅनीटाइझर तसेच इतर वस्तू देणेत आल्या .
या संस्थेचे अध्यक्ष योगेश
चिदरेवार, प्रोजेक्ट चेअरमन अरविंद पत्की, संस्थापक अध्यक्ष अभिजीत औटे , लेखक अनंत कदम, समीर परकोटे यांनी नुकसानग्रस्त कुटुंबीयांच्या भेटी घेऊन त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. बाधित कुटुंबांना देण्यात आलेल्या किट मध्ये जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. या सामाजिक संस्थानी सामाजिक बांधिलकी जपत या गावातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या कुटुंबीयांना मदतीचा हात देऊन माणुसकीचे दर्शन घडवले आहे. त्यामुळे नुकसान ग्रस्त भागातील कुटुंबीयांकडून या संस्थाचे कौतुक होत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार सुभाष भोसले यांनी केले . यावेळी विविध गावात पाहणी करताना मडिलगे बु॥ येथे संग्रामसिंह देसाई, सरपंच शुभांगी परीट ,युवराज सुर्वे, बाबूराव कांबळे, सुनिल तांबेकर , सागर माने, प्रकाश परीट कोनवडे येथे प्रा हिंदूराव पाटील, डे सरपंच सुभाष पाटील, बसरेवाडी येथे पत्रकार संदिप दळवी, कुरणी येथे प्रा .तुकाराम पाटील, निवास पाटील, सौ सरपंच पाटील, सुळकूड येथे पत्रकार धनजंय चवई, मूरगूड येथे सुनिल चौगले, प्रथमेश चौगले, डॉ अशोक खंडागळे, महेश खंडागळे आदि उपस्थित होते . या सस्थेचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button