Kolhapur

गिरगावात अनंतशांती बहूऊद्देशीय संस्थेमार्फत अर्सेनिक 30 औषधाचे वाटप

गिरगावात अनंतशांती बहूऊद्देशीय संस्थेमार्फत अर्सेनिक 30 आॅषधाचे वाटप

कोल्हापूरःआनिल पाटील

कोरोना हा आजार क्षणात येऊन जागतिक महामारी बनला आहे. या काळात घरी राहणे सुरक्षीत राहणे या तत्वावनुसार संपूर्ण जग कोरोनाशी जणू युद्ध करत आहे .भावी आयुष्यासाठी सुरक्षित जनता हि देशाची महानता आहे आणि हि महानता जपून ठेवणे हि तर प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे. यालाच अनुसरून देशाची संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा दिवस रात्र कोरोना प्रतिबंधना साठी लढाई करत आहेच. भारत सरकार आयुष् मंत्रालया द्वारे जाहिर झालेल्या अर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथी मेडिसिनचे संपूर्ण देशभरात वाटप चालु आहे. होमिओपॅथी हे एक शास्त्र, एक संशोधन तर एक तपश्चर्या आहे. हे तर वाघीनीचे दूध आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अनंतशांती बहुउद्देशिय सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर व कसबा वाळवे यांच्या मार्फत डाॕ. दीपा कुष्ठे डाॕ.नंदिनी गावडे डाॕ, अस्विनी खोराटे डाॕ. शैलाजा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गिरगांवमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यातआले होते. येथे अनेक दशकापासून मर्दानी खेळ जोपासला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची युद्ध कला जोपासणाऱ्या व विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या क्रांतीवीर फिरंगोजी शिंदे मर्दानी आखाड्यातील मावळ्यांना व रणरागीनीना या औषधाचे मोफत वाटप करण्यात आले . यावेळी अनंतशांती चे अध्यक्ष भगवान गुरव, माधुरी खोत, फिरंगोजी शिंदे संस्थेचे वस्ताद प्रमोद पाटील,प्रियांका पाटील, सुभाष पाटील,माजी सरपंच दिलीप जाधव,माजी सैनिक प्रकाश जाधव, ग्रामपंचायत सदस्य सुरेश पाटील, विश्वजीत पाटील,शितल चव्हान,मृणाल पाटील,सचिन चौगुले उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button