Chalisgaon

जिल्ह्यातील विविध कोविड सेंटर मध्ये जाऊन रूग्णांची चौकशी करणारे खासदार उन्मेशदादा पाटील यांचा सन्मान

जिल्ह्यातील विविध कोविड सेंटर मध्ये जाऊन रूग्णांची चौकशी करणारे खासदार उन्मेशदादा पाटील यांचा सन्मान

जिल्ह्यातील विविध कोविड सेंटर मध्ये जाऊन रूग्णांची चौकशी करणारे खासदार उन्मेशदादा पाटील यांचा आम्हाला सार्थ अभिमान – कुमावत (बेलदार) समाज सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब कुमावत यांचे प्रतिपादन कुमावत बेलदार समाज महाराष्ट्र राज्य सेवा संघाच्या वतीने खासदार उन्मेश दादा पाटील यांचा कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन गौरव : जिल्हाध्यक्ष,पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सत्कार

नूरखान

चाळीसगाव — संपूर्ण देश कोरोना महामारीच्या प्रसंगातून जात असतांना अनेक घटकांसोबत या कठीण काळात आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता खासदार उन्मेश दादा पाटील यांनी सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारीची जाणीव ठेवून केलेले सेवा कार्य अतुलनीय आहे.मतदारसंघातील अनेक नागरिकांना ,विद्यार्थ्यांना आपल्या गावी आणण्यासाठी मदत असो वा अतिशय बिकट प्रसंगी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईक यांना वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून देणे याबाबत खासदार उन्मेश दादा पाटील यांनी समाजातील सर्व घटकांना सहकार्य केले.जिल्ह्यातील कोविड सेंटर मध्ये जाऊन प्रत्यक्ष रुग्णांशी संवाद साधून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला या सहकार्याबद्दल कुमावत बेलदार समाज सेवा संघ आपली सामाजिक कृतज्ञता व्यक्त करीत आपला सन्मान करतो आहे. अशी भावना जळगाव जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब कुमावत यांनी यावेळी व्यक्त केली .

आज बेलदार समाज पदाधिकारी बांधवांनी खासदार उन्मेश दादा पाटील यांचा कोरोना योद्धा सन्मान पत्र देऊन गौरव केला याप्रसंगी पंचायत समितीचे उपसभापती सुनील पाटील,पंचायत समिती सदस्य कै.ची. बापू पाटील,नगरसेवक नितीन पाटील ,सामाजिक कार्यकर्ते नरेंद्रकाका जैन,उदय दादा पवार,बंडूभाऊ पगार, समकीत छाजेड,वाल्मिक महाले कुंझरकर ,कुमावत बेलदार समाज चाळीसगाव तालुका अध्यक्ष रामेश्वर कुमावत, तालुका संघटक दीपक कुमावत ,तालुका सचिव विक्रम कुमावत ,भास्करराव कुमावत, सुनिल कुमावत,सुमित कुमावत आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button