Chalisgaon

हिरापूर येथील रेल्वे पुलाखालील रस्ता पाण्यात: आठ गावांची वाहतूक ठप्प

हिरापूर येथील रेल्वे पुलाखालील रस्ता पाण्यात: आठ गावांची वाहतूक ठप्प

चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यात गेली दोन दिवसापासून सततधार पाऊस सुरू आहे. चाळीसगाव शहरासह अनेक गावांना पुराचा तडाखा बसला असून तितूर व डोंगरी नदीला महापूर आला आहे.अनेक गावात पाणी शिरले असून रस्त्यावर पाणी आल्याने संपर्क तुटला आहे. तालुक्यातील हिरापुर परिसरातही मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या रेल्वे पुलाखालील भागही पाण्याखाली आल्यामुळे ब्राम्हणशेवगे माळशेवगा ,अंधारी,तमगव्हाण,पिंपळवाडी निंकुभ,शेवरी, हिरापूर या गांवाची वाहतूक ठप्प होऊन संपर्क तुटला आहे. या पुलाखालील परिस्थिती दरवर्षी उद्भवत असल्याने व पर्यायी व्यवस्था करावी यासाठी या सर्व गावातील नागरिकांनी हिरापूर रेल्वे समन्वय समितीच्या माध्यमातून खासदार उन्मेष दादा पाटील, आमदार मंगेशदादा चव्हाण व रेल्वे प्रशासनाला साकडे घातले होते. सर्वेक्षणाव्यतिरिक्त कुठलेही पाऊल उचलले गेले नाही. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचे हिरापूर रेल्वे पुल समन्वय समितीचे दिपक पाटील, माळशेवगे,सोमनाथ माळी,ब्राम्हणशेवगे, सुनिल पाटील, तमगव्हाण,दत्ता नागरे,हातगाव,शरद नागरे,आनंदा वाघ,अंधारी,भैय्यासाहेब पाटील, सुधीर शिंदे,संता पहेलवान, अनिल कापसे.नितिन माळे हिरापूर व सदस्यांनी मत व्यक्त केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button