Chalisgaon

नागरी सुविधा पुरविण्यास नगर परीषद असमर्थ ठरल्यामुळे सामाजिक संघटनांच्या वतीने चाळीसगावी खड्ड्याचे जलपुजन आंदोलन

नागरी सुविधा पुरविण्यास नगर परीषद असमर्थ ठरल्यामुळे सामाजिक संघटनांच्या वतीने चाळीसगावी खड्ड्याचे जलपुजन आंदोलन

गोरख पारधी चाळीसगाव

चाळीसगाव : गेल्या चार वर्षांपूर्वी चाळीसगाव नगर परीषदेच्या व तीने शहरातील प्रमुख रस्त्याचे उद्घाटन होऊन कामे सुरू करण्यात आली होती. मात्र सुरू असलेली कामे अर्धात थांबवून कामे बंद करण्यात आली ती आजतागायत रस्त्यांचे कामे करण्यास चाळीसगाव नगर परीषद असमर्थ ठरल्यामुळे सामाजिक संघटनांच्या वतीने सात दिवस पुकारलेल्या आंदोलनाचा आज सहाव्या दिवशी दि ९ रोजी शहरातील गणेश रोड येथे रस्त्यात पडलेल्या खड्ड्यामधील पाण्याचे जलपुजन करून आंदोलन करण्यात आले.
तत्कालीन आमदार व विद्यमान खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या हस्ते विधानसभेची निवडणूक लागण्यापूर्वी शहरातील प्रमुख रस्त्याचे उद्घाटन करून कामे सुरू करण्यात आली होती. मात्र सुरू असलेली कामे अर्ध्यात थांबवून कामे बंद करण्यात आली ती आजतागायत रस्त्यांचे कामे सुरू करण्यात आली नाही. तर नगरपरीषदेच्या वतीने याबाबत सांगण्यात येते की भुयारी गटारीच्या कामाना शासनाच्या वतीने चाळीसगाव शहरात मंजुरी मिळाल्याने जिल्हाधिकारी यांनी आदेश काढत सुरू असलेले रस्ते भुयारी गटारी झाल्यानंतर करण्यात यावेत म्हणून रस्त्याच्या कामाना शहरात ब्रेक लागला असे आहे तर भुयारी गटारी प्रभाग क्र १ मधून नगरपरीषदेच्या वतीने सुरुवात करण्यात आल्यानंतर ही पुढील प्रभागात कामे अद्याप पर्यंत का पूर्ण झाली नाही असा प्रश्न चाळीसगाव कराना पडल्याशिवाय राहत नाही का या सर्व शहरातील बकाल परीस्थितीला राजकीय अनास्था असल्याचे निर्देशनास येताना दिसत आहे .चाळीसगाव शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा करीता निवडणूक झाली आणि शहर वासीयानी लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून सौ आशालता विश्वास चव्हाण यांना मोठ्या विश्वासाने निवडून दिले तर भाजपा ची सत्ता देखील नगर परीषदेत स्थापन झाली असे असताना शहराचा विकास का साधला गेला नाही. निवडणूकीत वचननामा सांगितल्याप्रमाणे विकास झाला का ? चाळीसगाव शहरातील नागरिकांना रस्त्यांची दुरावस्था,गटारींची स्वच्छतेचा अभाव,ओपन स्पेस ची वाईट अवस्था या समस्येला गेल्या पाच वर्षात सामोरे जावे लागले असल्याने चाळीसगाव नगरपरिषद शहर वासीयाना नागरी सुविधा पुरविण्यास असमर्थ ठरल्यामुळे रयत सेना ,मेरा गाव मेरा तीर्थ,आम आदमी पार्टीच्या वतीने शहरात सात दिवस आंदोलन पुकारण्यात आले. आंदोलनाचा आज सहाव्या दिवशी सामाजिक संघटनांच्या वतीने दि ९ रोजी गणेश रोड येथे रस्त्यात पडलेल्या खड्ड्यामधील पाण्याचे जलपुजन करून आंदोलन करण्यात आले.आंदोलनात रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, शिक्षक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश चव्हाण,जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड ,तालुका उपाध्यक्ष भरत नवले, विलास मराठे, दीपक देशमुख, सोनू देशमुख, अजय चव्हाण,मंगेश देठे तसेच मेरा गाव मेरा तीर्थ चे प्रवर्तक विजय शर्मा ,खुशाल पाटील, किशोर पाटील नारायण जेठवाणी यांनी सहभाग घेतला

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button