Chalisgaon

जमिनीशी नाळ असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हातात गावाच्या चाव्या दिल्यानेच चैतन्यतांडाची आदर्श गावाकडे वाटचाल – आमदार मंगेश रमेश चव्हाण

जमिनीशी नाळ असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हातात गावाच्या चाव्या दिल्यानेच चैतन्यतांडाची आदर्श गावाकडे वाटचाल – आमदार मंगेश रमेश चव्हाण

चाळीसगाव तालुक्यातील पहिले डासमुक्त गाव चैतन्य तांडा येथे विकासकामे लोकार्पण सोहळा संपन्न

चाळीसगाव: तालुक्यातील चैतन्य तांडा येथे लोक सहभाग व जल शक्ती अभियान अंतर्गत १०० टक्के डासमुक्त गाव झाल्याने या पार्श्वभूमीवर विविध विकास कामांचे लोकार्पण सोहळा माजी जि.प.सदस्य पोपट तात्या भोळे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याहस्ते शनिवार दि.३ जुलै रोजी आयोजित करण्यात आले.
लोक सहभाग व जल शक्ती अभियान अंतर्गत शंभर टक्के डासमुक्त गावाबरोबर चौदाव्या वित्त आयोगाच्या विविध विकास कामांचे लोकार्पण सोहळ्याचे आयोजन तालुक्यातील चैतन्य तांडा येथे शनिवार रोजी करण्यात आले. सदर कार्यक्रम हा माजी जि.प.सदस्य तात्या भोळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन चाळीसगाव मतदार संघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी चेअरमन दिनकर राठोड यांनी केले. दरम्यान गावात एकूण २५० कुटुंब हे वास्तव्यास आहे. ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच ह्या अनिता दिनकर राठोड व उपसरपंच आनंदा राठोड आहेत. सर्वांच्या अथक प्रयत्नातून गेल्या काही दिवसांपासून गावात विकासात्मक कामे केली जात आहे. जसे की, १४ वा वित्त आयोगाच्या निधीतून गावात ५ लाखाचे कॉंक्रीटीकरण, आमदार निलय नाईक यांच्या स्थानिक विकास निधीतून ३ लाखांचा प्युअर ब्लॉग (संगम हॉटेल समोर), खासदार यांच्या विकास निधीतून ३ लाखांचा प्युअर ब्लॉग, तसेच लोकवर्गणीतून गावात २०० कुटुंबाचे सौच खड्डे करण्यात आले आहे. उर्वरीत ५० सौच खड्डे हे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी मनरेगा योजनेअंतर्गत बांधून दिले आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या काळात विना मास्क धारकांवर केलेल्या दंडात्मक कारवाईतून एकूण ७० हजार महसूल ग्रामपंचायतीला प्राप्त झाले आहेत.
या कार्यक्रमाप्रसंगी आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, शिवनेरी फाऊंडेशन अंतर्गत चैतन्य तांड्यात विविध जलसिंचनाची विकास कामे करण्यात आली आहे. शोषखड्डा असो की जलसंधारण याचा फायदा गावातील ग्रामस्थांना झालेला आहे. त्यामुळे चैतन्य तांडा हा डासमुक्त गाव म्हणून तालुक्यातील पहिला मानकरी तर आहेच परंतु शासकीय योजनेचा लाभातही प्रथम गाव ठरला आहे. फक्त दिनकर राठोड यांच्या अथक परिश्रमातून हे कार्य सुरू आहे. ग्रामस्थांनी योग्य व्यक्तीच्या हातात नेतृत्व दिल्यामुळेच विकासात्मक बाबी घडत असल्याचे सुतोवाच आमदार चव्हाण यांनी केले. तसेच गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी चैतन्य तांड्याला मनरेगा योजनेअंतर्गत आदर्श गाव बनवण्याचे निर्धार केले असल्याचे सांगितले. यावेळी आमदार मंगेश चव्हाण, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, माजी जि.प.सदस्य पोपट तात्या भोळे, माजी सभापती दिनेश बोरशे, जि.प. सदस्य मंगला भाऊसाहेब जाधव, माजी उपसभापती संजय भास्कर पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील निकम, माजी महिला आघाडी तालुकाध्यक्ष्या नमोताई राठोड व तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचे सरपंच महेंद्रसिंग राठोड (सांगवी), संजीव राठोड (वलठान), गोरख राठोड (जुनोने), गोरख राठोड (शिंदी), कैलास राठोड (तळोंदा), साहेबराव राठोड (माजी सरपंच तळोंदा), अनिल चव्हाण (लोंजे), गुलाब राठोड (बोढरे), अर्जून राठोड (उपसरपंच बोढरे), किसनराव जोर्वेकर (उपसरपंच टाकळी प्र.चा), शाम सोनवणे (कळमडू सदस्य), किरण देवरे (करगाव), विकास सोसायटीचे चेअरमन बाबुराव मराठे (करगाव), मणिषा पाटील, गजानन चौधरी, तालुका शिवनेरी फाउंडेशनचा तालुका समन्वय राहुल राठोड विस्ताराधिकारी माळी भाऊसाहेब आमदार कार्यातून योगेश महाजन, पवन देवरे यांचे सहकार्य लाभले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button