Chalisgaon

नागद रोडवरील भंगार दुकानदाराची दादागिरी कायम – नगरपरिषदेच्या सुचनेनंतर देखील कॉम्प्लेक्स समोरील अतिक्रमण कायम

नागद रोडवरील भंगार दुकानदाराची दादागिरी कायम – नगरपरिषदेच्या सुचनेनंतर देखील कॉम्प्लेक्स समोरील अतिक्रमण कायम

चाळीसगाव प्रतिनिधी-
मनोज भोसले .

चाळीसगाव – शहारातील नागद रोडवरील पाण्याच्या टाकीशेजारील नगरपरिषदेच्या कॉम्प्लेक्स समोर आवारात त्याच कॉम्प्लेक्स मधील भंगार दुकानंदाराचे गाळे आहेत या भंगार दुकानदाराने चक्क त्याच्या दुकानाचे जुने भंगार कॉम्प्लेक्स च्या आवारात ठेवले आहे यामुळे शेजारील दुकानदारांकडे या अतिक्रमण केलेल्या भंगार मुळे ग्राहक जात नसल्याने त्यांचे मोठया प्रमाणावर नुकसान होत आहे हे अतिक्रमण काढावे याबाबत वारंवार नगरपरिषदेला तक्रारी करून देखील यावर कारवाई होत नसल्याने दुकानदारांचे मोठे नुकसान होत आहे याबाबत नगरपरिषदेचे अतिक्रमण प्रमुख यांनी अतिक्रमण काढण्याच्या सूचना देऊन देखील या भंगार दुकानदाराने सदर अतिक्रमण केलेले भंगार काढले नाही व दादागिरी मध्ये अतिक्रमण सुरूच आहे शिवाय रस्त्यावर देखील मोठया प्रमाणावर भंगार ठेवले असल्याने वाहतुकीला देखील अडथळा निर्माण होत आहे.

या भंगार दुकानदारावर कारवाई होत नसल्याने नगरपरिषदेचे काही या दुकानदारासोबत आर्थिक हितसंबंध आहेत काय अशी चर्चा आता होत आहे नगरपरिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने सध्या अतिरिक्त मुख्याधिकारी तहसीलदार अमोल मोरे आहेत त्यांनी तरी हे अतिक्रमण काढून दुकानदारांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे असे नाही झाल्यास सदर दुकानदार न्यायालयात दाद मागणार असल्याचे बोलले जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button